आ. रोहित पवार यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती ची केली पहाणी

Spread the love

धाराशिव वाशी =रविवार दिनांक 20 सप्टेंबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चे आमदार रोहित पवार यांनी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तसेच वाशी तालुक्यातील येरमाळा, दुधाळवाडी तेरखेडा, इंदापूर ,बोरी या ठकाणी पाऊस नसल्यामुळे पीक करपून गेलेले आहे याची पाहणी आज त्यांनी केली. यावेळी त्यांनी बोलताना तेलंगणा कर्नाटक या राज्यांनी जुलै मध्येच ऑल न्यू च्या प्रभावामुळे दुष्काळी परिस्थिती जाहीर केली. मग महाराष्ट्रातच ऑक्टोबर ची तारीख कशासाठी सरकार पाहते आहे. यांना दुष्काळाचं काही देणंघणं नाही . इथे शेतकऱ्याचे प्रमाण ⁸शंभर टक्के नुकसान झालेले आहे सोयाबीन पिकाचे कापसाचे तुरीचे मजुराला काम नाही जनावरांना चारा नाही पाणी नाही. सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही किंवा कुठलीही हालचाल केलेली दिसत नाही गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीचे पैसे आणखी काही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत कर्जमाफीचे पैसेही आणखी दहा ते बारा लाख लोकांना मिळाले बाकीच्या लोकांना आणखी मिळालेले नाहीत 55 लाख शेतकऱ्यांना कधी कर्जमाफी देणार आहे तुम्ही फक्त आश्वासनाचा पाऊस हे शासन पाडत आहे. यावेळी शेतकऱ्यांनी काल नांदेड येथे झालेल्या बैठकीत आढावा बैठकीत काजू बदाम आमदार खासदार खातात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतात यावर बोलताना रोहित पवार म्हणाले तुम्ही काजू खा बदाम खा चिकन खा मटन खा वडापाव खा काय खायचे ते खा पण या बळीराजाला शेतकऱ्याला अगोदर तातडीने कशी मदत देता येईल हे अगोदर बघा. सरकारने शेतकऱ्याला 50 हजार रुपये एकर व मजुराला पंचवीस हजार रुपये देण्यात यावे अशी मागणी यावेळी येणाऱ्या काळात जर सरकारने नाही पावले उचलली तर मोठ आंदोलन उभारण्यात येईल आणि सरकारला गुडघ्यावर टेकवले जाईल असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले यावेळी यावेळी वाशीचे तहसीलदार मेहत्रे, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, सुपरवायझर, तलाठी, विमा कंपनीचे प्रतिनिधी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रताप पाटील, सुलक्षणा सलगर , माजी सभापती सुदन पाटील, शिवाजी घोलप, प्रवीण घोलप, रंजीत यांच्यासह,तालुक्यातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक =विलास गपाट

🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र🌻

निर्भीड ने पक्ष स सकारात्मक बातम्या साठी वाचा

प्रगत किसान डिजिटल प्रिंट लाईव्ह मीडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!