वाशी तालुक्यात बैल सण पोळ्यावर दुष्काळाचे सावट

Spread the love

वाशी=गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर बैल सण पोळ्यावर दुष्काळाचे सावट
वाशी तालुक्यातील इंदापूर येथे बैलपोळा सण यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील चारा व खरीप पिकाचे सोयाबीन कापूस मका आधी पिकांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे व सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे अखंड पावसाळ्यात तीन महिने लोटत आले तरी अतिशय कमी प्रमाणा त सरासरीपेक्षा तीस ते चाळीस टक्के पाऊस फक्त पडलेला आहे यामुळे पिके कोमेजून सुकून गेले आहेत व जनावरांचा चारा सुद्धा सुकलेला आहे यामुळे शेतकरी हवालदिल चिंता तूर झालेला आहे मजुराला पण रोजगार उपलब्ध होत नाही अशातच हा पोळा सण आला आहे. पण बळीराजा कितीही संकटात असला तरी त्याला त्याचे पशु धनावर जीवापाड प्रेम करत असतो आणि त्याचा हा सण म्हटल्यानंतर सर्व दुःख बाजूला सोडून वर्षभर ज्याच्या जिवावर शेती कसली जाते त्याचा सन तो आनंदाने साजरा करत असतो. यावर्षी दुष्काळाचे सावट असले तरी शेतकऱ्यांनी बैलांना रंगीबेरंगी फुगे जुली रंग देऊन सजावट करून हा सण साजरा केला.

filter: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; captureOrientation: 0;
shaking: 0.000000; highlight: 0; algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask: 0;
brp_del_th: 0.0000,0.0000;
brp_del_sen: 0.0000,0.0000;
delta:1;
bokeh:1;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 32768;cct_value: 0;AI_Scene: (11, 0);aec_lux: 207.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 40;

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!