इंदापूर येथे दुष्काळी पिकांचे पंचनामे सुरु

Spread the love

इंदापूर येथे दुष्काळी पिकांचे पंचनामे सुरू
वाशी= वiशी तालुक्यातील इंदापूर येथे बुधवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुष्काळी परिस्थिती मुळे झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू. याबाबत अधिक वृत्त असे की महाराष्ट्र शासनाने मागील आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रातील 265 तालुक्यात संपूर्ण पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. जनावराचा चारा वाळून गेलेला आहे शेतीसाठी पाणी नाही पिके वाळून गेली आहेत . शेतकरी हवालदिल झालेला आहे . आणि रब्बी पिकाचा पेरणी हंगाम हस्त नक्षत्रात सुरू झाला आहे पण जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे शेतकरी ची पेरणी खोळंबली आहे.यामुळे या परिस्थितीचा आढावा घेऊन शासनाने कोरड्या दुष्काळ जाहीर केला असून साठी वरील तालुक्यात ट्रिगर 1 लागू केला आहे. व शेतकऱ्यांना झालेल्या पीक नुकसानाची भरपाई देण्यासाठी या अंतर्गत आता खरीप पिकातील सोयाबीन, तूर ,मूग, उडीद,मका आधी पिकाचे पंचनामे करण्यासाठी सांगितले आहे यामुळे तात्काळ तलाठी, कृषी सहाय्यक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करीत आहेत . यावेळी कृषी सहाय्यक दळवी मॅडम ,तलाठी वाघमारे मॅडम हिंदूराज गपाट, पोलीस पाटील बालाजी पारडे, विष्णू गपाट, दादा कवडे, विलास गपाट आदी शेतकरी उपस्थित होते.

मुख्य संपादक विलास गपाट

प्रगट किसान प्रगत राष्ट्र

निर्भीड, निपक्ष, सकारात्मक बातम्या साठी

वाचा प्रगत किसान डिजिटल, प्रिंट, लाईव्ह मीडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!