वाशी दिनांक- ०१/०१/२०२४
वाशी- कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथील हिंदी विभाग प्रमुख डॉ.अरुण गंभीरे यांनी दिनांक ०१/०१/२०२४ पासून प्रभारी प्राचार्य म्हणून पदभार स्विकारला आहे. त्या अनुषंगाने महाविद्यालयामध्ये कार्यकौतुक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी मा.प्राचार्य डॉ.रविंद्र कठारे हिंदी विभाग प्रमुख तथा महाविद्यालयाचे नवनिर्वाचित प्रभारी प्राचार्य डॉ.अरुण गंभीरे स्टाफ वेलफेयरचे चेअरमन डॉ आनंद करडे उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी प्राचार्य डॉ.रविंद्र कठारे म्हणाले कि, पद, प्रतीष्ठा, यासाठी नाही तर विद्यार्थी केंद्र बिंदू मानून संस्था ग्रामस्थ आणि स्टाफ च्या सहकार्याने महाविद्यालयाच्या विकासासाठी काम केले. त्यामध्ये माझ्या कालावधीमध्ये NAAC करून घेतले, विद्यार्थ्यांच्या सुविधा यामध्ये वाढ केली तसेच कनिष्ठ विभागाकडील इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले याचे मला समाधान आहे. यावेळी बोलताना नवनिर्वाचित प्रभारी प्राचार्य डॉ.अरुण गंभीरे म्हणाले कि, माजी प्राचार्य संस्था गाव व स्टाफ ला बरोबर घेऊन तसेच त्यांचे योग्य मार्गदर्शन घेऊन काम करणार आहे माझ्या कडून कोणाच्याही अवास्तव अपेक्षा पूर्ण होणार नाही आणि कोणाचीही अकारण उपेक्षा होणार नाही तेंव्हा सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन आपल्या सर्वांच्या सहकार्याने महाविद्यालय प्रगती पथावर नेहण्याचा प्रयत्न करणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ आनंद करडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.महादेव उंदरे यांनी केले तर प्रा.महेंद्रकुमार चंदनशिवे यांनी आभार मानले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली यावेळी सर्व प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.
संपादक विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्या साठी
प्रगत किसान डिजिटल, प्रिंट मीडिया