मा आ प्रा तानाजीराव सावंत यांची तेरखेडा जिल्हा परिषद गटात जि प उमेदवार विकी चव्हाण यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

Spread the love

धाराशिव/ वाशी=मंगळवार 3 फेब्रुवारी आमदार प्राध्यापक तानाजीराव सावंत यांची जिल्हा परिषद तेरखेडा गटात जाहीर प्रचार सभा
जिल्हा परिषद उमेदवार संदेश उर्फ विकी चव्हाण यांच्या प्रचारात व पंचायत समिती उमेदवार पुनम बालाजी घोलप व अरुणा रावसाहेब शिंदे यांच्या प्रचारात भव्य शक्ती प्रदर्शन करत व तेरखेडा गावातून वाजत गाजत रॅली काढून घेतली सभा
तेरखेडा जिल्हा परिषद गटात 2025 मध्ये तीस कोटी निधी दिला . तसेच उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी आणली. यावेळी बोलताना सावंत म्हणाले विरोधकांनी फक्त आश्वासनाच्या मुद्द्यावर मत मागितली अडचणीत असणाऱ्या मतदारसंघातील नागरिकांना शासकीय कामे सोडून खिशातून एक रुपयाचं सामाजिक काम दाखवावा आणि नंतरच मत मागावा हा माझा सवाल आहे.
येथे प्रश्न विस्थापित आणि प्रस्थापितांचा नाही जो माझा तरुण कार्यकर्ता जनतेसाठी राबराब राबतो त्यालाच निवडून द्या घराणेशाही मोडीत काढा
वाशी भूम परांडा मतदारसंघात शिव जलक्रांती माध्यमातून केलेल्या कामामुळे यावर्षीच्या महाप्रलयातून आपल्या मतदारसंघातील जनतेचा व शेती पिकांचा बऱ्याच प्रमाणातबचाव झाला.
वाशी भूम परंडा मतदारसंघातील बंद पडलेले कारखाने नरसिंह व शिवशक्ती चालू केले यातून तरुणांना रोजगार मिळाला.
संपूर्ण महाराष्ट्रात आज पर्यंत400 च्या वर कुटुंब आत्महत्याग्रस्त दत्तक घेतले आहेत. 80% समाजकारण आणि 20 टक्के राजकारण आम्ही करतो.
विरोधाकावर आमदार तानाजीराव सावंत यांचा जोरदार हल्लाबोल
जिल्हा परिषद धाराशिव वर शिवसेनेचाच भगवा फडकवणार असा विश्वास ही यावेळी सावंत यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना उभाटा गटातील श्रीराम घुले, कादर पठाण यांनी शिवसेना शिंदे गटात तसेच दिग्विजय पाटील परंडा यांनी पण सावंत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी मंचावर जिल्हा परिषद उमेदवार संदेश उर्फ विकी चव्हाण ,पुनम बालाजी घोलप पंचायत समिती तेरखेडा उमेदवार, अरुणा रावसाहेब शिंदे इंदापूर पंचायत समिती उमेदवार भैरवनाथ शुगर कार्यकारी संचालक केशव सावंत, वाशी तालुका शिवसेना प्रमुख सत्यवान गपाट, नागनाथ नाईकवाडी, शिव हार स्वामी, युवा सेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले ,युवासेना तालुकाप्रमुख प्रकाश शेटे , तेरखेडा उपसरपंच फरीद पठाण सर ,बालाजी घोलप,अक्षय चव्हाण सुनील जाधवर यांच्या महिला व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक = विलास गपाट

,🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र 🌻

निपक्ष निर्भीड व सकारात्मक बातम्या साठी फॉलो करा
प्रगत किसान लाईव्ह फेसबुक, ई न्यूज पोर्टल, प्रिंट मीडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!