मतदारांनो तुम्ही देणारे आहात घेणारे बनू नकासौ. वैशालीताई मोटे

Spread the love

धाराशिव =वाशी बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी जिल्हा परिषद तेरखेडा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार बिभीषण अण्णा खामकर तसेच इंदापूर पंचायत समिती गणाचे उमेदवार शितलताई शिंदे यांच्या प्रचारार्थ इंदापूर येथे भव्य रॅली वाजत गाजत काढत शक्ती प्रदर्शन करत जाहीर सभेचे आयोजन केले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष रविकर मोराळे सर म्हणाले मागील वीस वर्षात माननीय आमदार राहुल भैया मोटे यांच्या माध्यमातून इंदापूर येथे बरीच कामे करण्यात आली आहेत व येथील मतदार जागृत आहे यावेळीही येथील मतदार खंबीरपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करेल यात शंका नाही .यावेळी दिलीप घोलप म्हणाले इंदापूर येथे झालेली पाणीपुरवठा योजना ही त्यावेळी पिंटू पाटील आम्ही त्यावेळेसचे पाणीपुरवठा मंत्री राठोड यांच्याकडून मंजूर केलेली होती. तसेच तुमच्या गावातील नरसिंह कारखाना हा तुमची अस्मिता आहे या कारखान्याचे नाव आता बदललेले आहे तुम्हाला तुमच्या गावाची अस्मिता नसण्याची अस्मिता असेल तर येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार भरपूर मताने निवडून द्या. यावेळी उमेदवार बिभीषणांना खामकर म्हणाले या मतदारसंघातील विकास व गुंडागर्दी व दहशत संपवायचे आहे म्हणून या वयात मी निवडणुकीसाठी उभा राहिलो सध्या नवा ट्रेंड आला आहे काळया पैशाच्या माध्यमातून रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे गुंडागर्दी करणे यामुळे गावातील वातावरण बिघडत आहे पूर्वीसारखे राजकारण राहिले नाही हे सर्व थांबवण्यासाठी व गोरगरिबांना न्याय देण्यासाठी व तरुण पिढी बरबाद होण्यापासून रोखण्यासाठी मी या वयात ही ही निवडणूक लढवत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाडा अध्यक्ष व माजी आमदार राहुल भैया मोटे यांच्या सुविद्य पत्नी यावेळी बोलताना म्हणाल्या राहुल भैया च्या काळात अनेक विकास कामे झाली. या भागात रस्ते सभागृह लई चे सब स्टेशन कॅनलची कामे केली. मतदारांनो तुमचे अनमोल मत तुम्ही विकासाला द्या तुम्ही देणारे दानशूर आहात घेणारे बनू नका. या सभेस राष्ट्रवादी काँग्रेस वाशी तालुका अध्यक्ष भाऊसाहेब सांडशे, नगरसेवक भागवत कवडे, प्रवीण कवडे, बाबुराव घुले, दिलीप आबा घोलप ,मोराळे सर,इंदापूर माजी सरपंच रमेश पाटील, यांच्यासह मतदारसंघातील महिला पुरुष मतदार बहुसंख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक = विलास गपाट

,🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र 🌻

निपक्ष निर्भीड व सकारात्मक बातम्या साठी फॉलो करा
प्रगत किसान लाईव्ह फेसबुक, ई न्यूज पोर्टल, प्रिंट मीडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!