तेरखेडा जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बिबीशन अण्णा खामकर यांच्या प्रचारात माजी आमदार राहुल मोटे यांची जाहीर सभा
आमदार सावंत यांच्यावर केला हल्लाबोल.
वाशी=गुरुवार दिनांक 5 जानेवारी रोजी सायंकाळी तेरखेडा येथे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार बिभीषण अण्णा खामकर व पंचायत समिती उमेदवार रत्नमाला घोलप तसेच पंचायत समिती उमेदवार शितल शिंदे यांच्या प्रचारात भव्य रॅली काढून सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिलीप घोलप गोविंद घुले रंजीत घुले भाऊसाहेब सांडसे आदींची भाषणे झाली. यावेळी बोलताना उमेदवार बिभीषण अण्णा खामकर यांनी शिवसेनेचे उमेदवार यांच्यावर हल्ला चढवत गुंड प्रवर्तीचा नाय ना ट करण्यासाठी व गावातील वातावरण शांत राहण्यासाठी, तेरखेडा ची ओळख चोराचा तेरखेडा अशी होत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींना आग्रह केला म्हणून मी या वयातही निवडणूक साठी उभा असल्याचे म्हटले. निवडून येण्याचा निर्धार व्यक्त केला आमदार राहुल मोठे म्हणाले मी वाशी भूम परांडा मतदार संघ132 के व्ही ची दहा ते बारा सबस्टेशन केले, परंडा ला 220 केवी चे केंद्र केले. तसेच सिंचनासाठी संगमेश्वर प्रकल्प कडकनाथ वाडी एस वन डी हिवर्डा आदी प्रकल्प केले.
आमदार सावंत यांच्यावर टीका करताना राहुल मोठे म्हणाले वाशीला एमआयडिसी मंजूर झाली म्हणून सांगितले कुठेही मंजुरी आलेली नाही त्याचे शासकीय नोटिफिकेशन नाही खोटं बोललं जात आहे. यावेळी बोलताना आरोग्य मंत्री असताना ॲम्बुलन्स घोटाळा 5000 कोटीचा केलेला आहे तोही आता बाहेर निघणार आहे असे ठणकावून सांगितले. आम्ही बोंबला एमआयडीसी केली पाणी लाईट सर्व सुविधा दिल्या आज भरपूर उद्योग तेथे चालू आहेत. या गोष्टी आम्ही उभ्या केल्या आहेत म्हणून येत्या निवडणुकीत सर्व मतदार बंधू-भगिनींनी अन्नाच्या पाठीशी खंबीर उभे राहावे विजय आपलाच आहे असे आव्हान केले. यावेळी सभेला उपस्थित गोविंद घुले, बाबुराव घुले ,शिवाजी घोलप, नारायण घोलप ,रणजीत दादा मोठे ,भाऊसाहेब सांडसे, रवीकर मोराळे ,माजी सभापती सुधन पाटील ,रणजीत घुले ,विजय घोलप ,दिलीप घोलप ,प्रशांत कवडे ,सद्दाम पठाण, प्रवीण घोलप, रमेश पाटील, वंचित बहुजन आघाडीचे सरवदे सर,यांच्यासह महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक = विलास गपाट
,🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र 🌻
निपक्ष निर्भीड व सकारात्मक बातम्या साठी फॉलो करा
प्रगत किसान लाईव्ह फेसबुक, ई न्यूज पोर्टल, प्रिंट मीडिया