गुणवंत विद्यार्थी, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती ,शेतकरी यांंचा सन्मान करण्यात आला.
वाशी – शनिवार दिनांक 6 जानेवारी 2024 आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त वाशी येथे व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून वाशी तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
सामाजिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र व कृषी क्षेत्र इत्यादी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सत्कारमूर्तीं व मान्यवरांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या उपक्रमाचे कौतुक करत व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे आभार मानले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर नगरपंचायत वाशीचे उपनगराध्यक्ष सुरेश बप्पा कवडे होते. तसेच वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दासुरकर त्याचबरोबर जिल्हा ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर दयानंद कवडे व स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक माने व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा व्यवस्थापक दिनेश कलापुरे, नगरपंचायत वाशी गटनेते नागनाथ नाईकवाडी या प्रमुख पाहुण्यांसह राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष एडवोकेट सूर्यकांत सांडसे, कृषी उत्पन्न बाजार समिती वाशीचे माजी संचालक विकास पवार, शिवसेना शिंदे गटाचे तालुका उपप्रमुख विकास तळेकर, जाणीव संघटनेचे रामभाऊ लगाडे, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चेडे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे हरून काझी, प्राध्यापक अनिल कारंडे, आबाराव कोल्हे, युवक काँग्रेसचे वाशी तालुका अध्यक्ष अवधूत क्षीरसागर यांच्यासह वाईस ऑफ मीडिया वाशीचे पदाधिकारी सदस्य व इतर पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादक=विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यासाठी
प्रगत किसान डिजिटल प्रिंट मेडिया