उमेदच्या 501 बचतगटांना भारतीय स्टेट बँकेतर्फे 10 कोटींचे कर्ज वाटप

Spread the love

धाराशिव दि..8/11/23

जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे आज उमेदच्या 501 बचत गटांना सुमारे 10 कोटी इतक्या रक्कमेच्या कर्जाचे वाटप जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतीय स्टेट बँकेने उमेद एम. एस. आर. एल. एम. यांच्या सुमारे 501 बचत गटांना कर्ज वाटप मेळावा आयोजित केला होता.यामध्ये जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील बचत गटांचा समावेश करण्यात आला होता.
या प्रसंगी भारतीय स्टेट बँकेच्या जनरल मॅनेजर मेरी सगाया धनपाल, डेप्युटी जनरल मॅनेजर प्रियकुमार सारीगाला, रिजनल मॅनेजर नरसिंग कुमार मेहता व डी. आर. डी. ए. च्या प्रोजेक्ट डायरेक्टर प्रांजल शिंदे, लीड बँकेचे मुख्य प्रबंधक श्री.दास आदी उपस्थित होते.
डॉ.सचिन ओंम्बासे यांनी बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन करताना बचत गटांनी शासनाच्या पी. एम. जी. ई. पी व सी. एम. जी. ई. पी या योजनांतर्गत जास्तीत जास्त प्रस्ताव बँकांकडे सादर करावेत. असे आवाहन केले. भारतीय स्टेट बँक ही बचत गटांना कर्ज मंजुरी देण्यास सकारात्मक प्रतिसाद देत आहे, असे नमूद केले. धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्हाच्या यादीत आहे. त्यामुळे बचत गटांनी शासनाच्या बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा फायदा घेऊन जिल्ह्यास विकसित जिल्हा बनविण्यास मदत करावी, असे आवाहनही बचत गटाच्या सभासदांना केले.
भारतीय स्टेट बँकेने 50 लाख रुपये व त्यावरील व्यावसायिक कर्जासाठी धाराशिव येथे नवीन एस. एम. ई शाखा सुरू केली आहे. या शाखेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी बँकेचे वरिष्ठ अधिकारी धाराशिव येथे आले होते. या प्रसंगी त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून जिल्ह्याच्या एकंदर विकासात भारतीय स्टेट बँकेचे भरीव योगदान राहील याची ग्वाही दिली.

चेक वाटप करताना जिल्हा अधिकारी सचिन ओम्बासे व बँक अधीकारी

संपादक =विलास गपाट

निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी संपर्क

9689707384

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!