वाशी=दिनांक 19 नोव्हेंबर रोजी मराठा क्रांती योद्धा माननीय जरांगे पाटील यांच्या इट येथील (तालुका भूम )सभेच्या आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की 15 नोव्हेंबर रोजी इथे माननीय मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. या सभेच्या आयोजकावर 19 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला यामुळे 21 नोव्हेंबर रोजी भूम वाशी येथील सकल मराठा बांधव वाशी पोलीस स्टेशन येथे येऊन पोलीस निरीक्षक शशी दसुरकर यांची भेट घेऊन कुठल्याही राजकीय दबावापोटी मराठा समाज बांधवांवर गुन्हे दाखल करू नये अशी मागणी करण्यात आली. आज पर्यंत सकल मराठा बांधवांनी शांतपणे पोलीस प्रशासनाला सहकार्य केलेले आहे सर्व आंदोलने शांततेत केलेली आहेत. मुळे चुकीचा संदेश महाराष्ट्रात. जाऊन प्रशासन व समाज बांधव यांच्यात तणाव निर्माण होऊ शकतो. सकल मराठा बांधवांना चर्चा करून व विश्वासात घेऊनच कारवाई करण्याची विनंती केली.
संपादक विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्या साठी