वाशी=वाशी तालुक्यातील दसमेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी हिंदवी परमेश्वर चौरे हिची नांदेड येथे 21 -22 नोव्हेंबर2023 रोजी झालेल्या स्पर्धेत लातूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला असून तिची आता राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे बालेवाडी पुणे येथे आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक व रहायथमिक जिम्नॅस्टिक अशा सात प्रकारच्या होणाऱ्या जिम्नॅस्टिक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे या स्पर्धेसाठी तिला लटके सर( जिल्हा क्रीडा अधिकारी ),मंगेश खोपकर सर, लक्ष्मण फुलारे सर, जाधवर सर ,संतोष सर या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. राज्यस्तरावर तिची निवड झाल्याबद्दल वाशी तालुक्यातून तिचे अभिनंदन होत आहे.