वाशी =(धाराशिव )वाशी तालुक्यातील इंदापूर येथे दोन डिसेंबर पासून साखळी उपोषणास प्रारंभ .. क्रांतीसुर्य ,मराठा योद्धा माननीय मनोज पाटील जरांगे यांनी महाराष्ट्रातील तमाम सकल मराठा बांधवांना एक डिसेंबर पासून प्रत्येक गावात. साखळी उपोषण करण्याचे आवाहन केले होते. या आव्हानास प्रतिसाद देत वाशी तालुक्यातील इंदापूर दहिफळ गोजवाडा आदी गावात साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे. शासनाने मराठा आरक्षणा संदर्भात 24 डिसेंबर तारीख दिलेली आहे या अनुषंगाने सरकारला स्मरण राहण्यासाठी, वातावरण निर्मितीसाठी, सरकारवर आरक्षणा साठी दबाव आणण्यासाठी व सकल मराठा बांधवांना लवकरात लवकर आरक्षण मिळावे याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात साखळी उपोषण करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले होते. मराठा योद्धा माननीय जरांगे पाटील यांच्याही महाराष्ट्रभर या अनुषंगाने भेटीगाठी व जाहीर सभा होत आहे. या उपोषणाबाबत माननीय तहसीलदार वाशी, पोलीस स्टेशन वाशी यांना निवेदनेेे देण्यात आलेली आहेत निवेदनावर शेकडो सकल मराठा बांधवांच्याा स्वाक्षऱ्या आहेत.
संपादक विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी वाचा
प्रगत किसान डिजिटल,लाईव्ह , प्रिंट मीडिया.