वाशी =दि.6 डिसेंबर.
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या संकल्पनेतून सुरू असलेला फिरता दवाखाना आज वाशी तालुक्यातील हातोला गावामध्ये आला होता. येथील नागरिकांची प्राथमिक तपासणी करून उपचार करण्यात आले.यावेळी शेकडो नागरिकांनी यामध्ये तपासणी केली असून यामध्ये ईसीजी,एक्स-रे,ब्लड टेस्ट आदी तपासण्या गावतील नागरिकांनी करून घेतल्या.या कार्यक्रमाची सुरुवात हातोल्यातील ज्येष्ठ नागरिक भारत खवले यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आली. यावेळी शिवसेना उप तालुका प्रमुख संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी विकास तळेकर,शरद पवार,विलास खवले,प्रवीण खवले,प्रताप चव्हाण,गणेश खवले,नवनाथ खवले,अच्युत खवले,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय खोमणे, फय्या शेख,पूजा शेटे,पूजा जाधव आदी गावातील नागरिक व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
संपादक विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्या साठी
वाचा प्रगत किसान डिजिटल मीडिया