वाशी = (धाराशिव) दिनांक 13 /12 /23 बुधवारी त्रिस्तरीय केंद्रीय पथकाने वाशी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी बोरी येथीलअंगद घायाळ, रघुनाथ कवडे सोयाबीन (sorgham ) ,तूर (Red gram)पिकाची पाहणी केली तसेच पाझर तलावातील (percolation )पाणीसाठा संपलेला पहाणी केली. विजोरा येथील राजेंद्र खोसे यांच्या कापूस (cotton) तर लोणखस येथील प्रभाकर भोसले यांच्या डाळिंब (pomegranate) तसेच वाशी येथील शिवाजी कवडे यांच्या पेरणी विरहित जमीन व विहिरीची (well)पाहाणी करण्यात आली. या त्रिस्तरीय पथकामध्ये अधिकारी मा.मोतीराम (assist commi.), मा. मनोज कुमार (अवर सचिव), मा. शिव चरण मीना (reserch off.) यांचा समावेश होता. यावेळी विभागीय सहसंचालक दिवेकर साहेब लातूर ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माने सर, अप्पर जिल्हा अधिकारी शिवाजी शिंदे , उपविभागीय कृषी अधिकारी भोसले साहेब, उपविभागीय अधिकारी संजय पाटील ( महसूल) वाशी तहसीलदार नरसिंग जाधव, गट विकास अधिकारी संतोष नलावडे, तालुका कृषी अधिकारी बर्वे, खानापूर ,बोरी, इसरूप ,ग्रुप ग्रामपंचायत सरपंच संगीता भारती, ग्रामसेवक राऊत, तलाठी डाकवले पशुसंवर्धन अधिकारी दळवी, पो .हे .को लोंढे बापू यांच्यासह शेतकरी अंगद घायाळ ,सुशांत पवार, अनिल पाटील, विकास कोळी ,संजय पांरडे विक्रम गपाट ,विलास गपाट उपस्थित होते. यावेळी केंद्रीय पथकासमोर संजय पारडे ,विलास ग पाट यांनी जनावरांसाठी चारा डेपो, शेतकऱ्यांसाठी पिक नुकसान भरपाई, विमा, कांद्यासाठी भाव सोयाबीन साठी भाव मिळावा व सततच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतीसाठी संरक्षित पाण्यासाठी शेतकऱ्यांना. शंभर टक्के अनुदानावर शेततळ्यi साठी खोदकाम व अस्तरीकरण (farmer pond)मागणी केली. याची प्रामुख्याने त्रिस्तरीय केंद्रीय पथकाने नोंद घेतली .
संपादक = विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्या साठी
प्रगत किसान डिजिटल मीडिया