बीड 23 /12/23 शनिवार
बीड येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाच्या (maratha reservation)पार्श्वभूमीवर सरकारला जागे करण्यासाठी इशारा सभा घेण्यात आली. लाखोंच्या संख्येने जमलेल्या सकल मराठा बांधवांन संबोधित करताना सरकारमधील व सर्व पक्षीय मराठा आमदार खासदार यांना मराठा आरक्षणासाठी मराठा (maratha )समाजाच्या पाठीमागे खंबीर उभा राहण्याचे आवाहन केले अन्यथा मराठा समाजाचे दार कायमस्वरूपी बंद होईल असा इशारा त्यांनी बीड येथील सभेत दिला . यावेळी छगन भुजबळ यांचे नाव न घेता येवल्याचं येडपट असे म्हणत ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळत असताना जाती जाती ततेड निर्माण न करता गप्प बसण्याचा सल्ला दिला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व जरांगे पाटील यांच्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्प्पवृष्टी करण्यात आली येथेे जमलेल्या सकल मराठा बांधवांसाठी हा क्षण अविस्मरणीय ऐतिहासिक होता. यावेळी बोलताना पाटील म्हणाले सरकारला पहिल्यांदा चाळीस दिवसाची मुदत दिली. नंतर दोन महिन्याची मुदत दिली आता मराठ्यांचे कुणबी नोंदी असलेले लाखो पुरावेे सापडलेले आहे सरकारनेेेे आता अहवाल बनवून कायदा पारित करून मराठ्यांना ओबीसी मधूूून आरक्षण द्यावेे आता शासनाला एक तास ही मुदत वाढवून दिली जाणार नाही पुढचं आंदोलन सरकारला महागात जाईल असाा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
संपादक =विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्या साठी
प्रगत किसान डिजिटल मीडिया