धाराशिव /वाशी मंगळवार 9 जानेवारी 2024
:- महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते दि. 9 जानेवारी रोजी वाशी येथे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात आले.
पालकमंत्री डॉ.सावंत म्हणाले, आरोग्य सेवा बळकट करण्यात शासन कमी पडणार नाही. तसेच निधीची कमतरताही देखील पडू देणार नाही. येत्या एका वर्षात हे रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी सज्ज होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.तसेच डॉ सावंत यांनी माजी आमदार यांचे नाव न घेता म्हणाले की पूर्वीच्या आमदारा सारखे माझे एजंट तुमच्या दारात हफ्ते मागण्यासाठी बसत नाहीत .यावेळी डॉ सावंत यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत जनतेची कामे करण्याचे आदेश दिले
यावेळी विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ.अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, वाशी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ दयानंद कवडे यांच्यासह प्रमुख लोकप्रतिनिधी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाला तालुक्यातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादक = विलास गपाट
प्रगट किसान प्रगत राष्ट्र
सकारात्मक बातम्या साठी