पत्रकार कलम का शिपाही =समाजाचा धागा =प्रा.डॉ .गंभीरे
धाराशिव/ वाशी= 11जानेवारी 2024 गुरुवार पत्रकार दिनाचे औचित्य साधून कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथीील सभागृहात आयोजित कार्यक्रमात वाशीी तालुक्याती ल सर्व मान्यवर पत्रकारांचा सन्मान शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन करण्याात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक गंभीरे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार बळीराम जगताप, मुकुंद चेडेे हे होत. यावेळी आपलेेे मनोगत व्यक्त करताना डॉक्टर गंभीरे सर यांनी पत्रकार कलम का शिपाही व समाजाचा धागा असतो असे म्हणाले. तसेच विद्यार्थी केंद्रित शिक्षण नावावर भर देणार असल्याचे व कॉलेज अद्यावत करणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
या वळी बोलताना जेष्ठ पत्रकार मा.बळीराम दादा जगताप म्हणाले कि, पत्रकार हा एक समाज सेवक असून अन्याय अत्याचार विरुद्ध लढणारा व्यक्ती आहे. तसेच पत्रकारांनी महाविद्यालयातील बातम्या देत असताना नेहमी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केला पाहिजे त्यामुळे विद्यार्थांना प्रोत्सहान मिळते व त्यांची प्रगती होण्यास मदत होते असे ते म्हणाले.
दैनिक एकमत चे पत्रकार मा.एम.आय मुजावर म्हणाले कि, भाषेची थोरवी किंवा महिती वाढवण्याचे काम वृत्तपत्रांनी तसेच पत्रकारांनी केले. जनतेच्या हिताच्या शासकीय योजना किंवा निर्णय जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम प्रभावीपणे पत्रकार करत असतात त्याच बरोबर अलीकडे वृत्तपत्रातील बातमीचा प्रभाव कमी होत चाललेला आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गंभीरे म्हणाले कि , इंग्रजांच्या काळामध्ये जिथे बोलणे अवघड होते त्यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्र चालू करून समाजसेवेचे मोठे काम केले आहे. संस्थेने माझ्यावर प्राचार्य पदाची जवाबदारी दिलेली आहे ती मी महाविद्यालयातील सर्व घटक ग्रामस्थ पत्रकार बंधू विद्यार्थी विद्यार्थीनी यांच्या सहकार्याने पूर्ण करून महाविद्यालय क्रिडा गुणवत्ता क्षेत्रामध्ये पुढे नेहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे या कार्यक्रमध्ये महाविद्यालयाच्या वतीने मा.बळीराम दादा जगताप, मा.मुकुंद काका चेडे, मा गौतम दादा चेडे, मा.प्रा.शहाजी चेडे,मा.एम. आय मुजावर, मा.दादासाहेब लगाडे, मा.नवनाथ टकले,मा.शिवाजी गवारे.मा.नेताजी नलवडे, मा.शोएब काझी, मा.विलास गपाट, मा.विक्रांत उंदरे व मा.सचिन कोरडे यांच्या सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ आनंद करडे यांनी केले सूत्रसंचालन प्रा.महादेव उंदरे यांनी केले तर आभार प्रा.डॉ बालाजी देवकते यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.राजेश उंदरे, प्रा.एम.डी टिपरसे, श्री.स्वप्निल शेलकांदे,श्री.मुकुंद कोळी व श्री.चंद्रकांत घाडगे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थींनी उपस्थित होते.
मुख्य संपादक
विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्या साठी वाचा
प्रगत किसान डिजिटल, प्रिंट मीडिया