धाराशिव /वाशी=
. दिनांक-१५/०१/२०२४
-कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे तालुका विधी सेवा समिती वाशी, विधीज्ञ मंडळ वाशी व कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.एच.एम मोमीन साहेब (सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग वाशी) मा.श्री.प्रताप बलभीम कवडे (अध्यक्ष विधीज्ञ मंडळ वाशी) मा. एस.डि दसूरकर (पोलीस निरीक्षक वाशी) आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गंभीरे उपस्थित होते.
या वेळी बोलताना विधीज्ञ एस.एन कावळे यांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच बालिका दिवस आणि लहान मुलांचे कायदे या विषयी माहिती सांगितली तसेच प्रत्येकाचे हक्क आणि कर्तव्य या विषयी मार्गदर्शन केले.
पोलीस निरीक्षक मा. एस.डि दसूरकर यांनी वाहतूक नियंत्रणाचे नियम तथा कायद्या विषयी माहिती दिली रस्ताने कसे चालावे हेल्मेट चा वापर लायसन ची गरज तसेच वाहन विमा या विषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.एच.एम मोमीन साहेब यांनी आपले विचार कसे असावेत तसेच जीवनामध्ये नियोजनाचे महत्व व अंमलबजावनी या विषयी मार्गदर्शन केले जीवनामध्ये शिस्त महत्वाची आहे असे ते म्हणाले. समाज माध्यमाचा वापर चांगल्या कामासाठी केल्यास ते उपयुक्त ठरते असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एम.डी उंदरे यांनी केले सूत्रसंचालन विधीज्ञ श्री.पी.आर जोगदंड यांनी तर आभार प्रा.विठ्ठल गुंजाळ यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विधीज्ञ श्री. ए.आर पवार, विधीज्ञ श्री.एच.ए देशमुख प्रा.डॉ संजय माळी,प्रा डॉ.अनंत पाटील,प्रा.निलेश पाटील,प्रा.राजेंद्र वासकर , प्रा.एन.के पाटील,प्रा.संजय बांबेरे,श्री दत्ता फुले यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थीनी प्राध्यापक कर्मचारी विधीज्ञ मंडळी उपस्थित होते.
मुख्य संपादक. = विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्या साठी
वाचा प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया.