वाशी =इंदापूर दिनांक 28 जानेवारी येथे मराठा आरक्षण लढ्याला यश मिळाल्यामुळे व इंदापूर येथील सकल मराठा समाज बांधव मराठा योद्धा माननीय मनोज जरंगे पाटील यांच्या आव्हानाला साथ देत मुंबई येथे आरक्षण लढ्यासाठी गेले होते 26 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील नवीन मुंबई वाशी येथे जमलेल्या करोडो मराठा बांधवांच्या एकजुटी पुढे व शक्तीपुढे झुकत शासनाने मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मंजूर केले. . यामुळे इंदापूर येथील सकल मराठा बांधवाने व मुंबई येथे उपोषणास गेलेल्या उपोषण कर्त्यांचे स्वागत करून डीजे लावून फटाक्यांची अतिश बाजी करीत गावातून मिरवणूक काढण्यात आली गावातील भवानी मंदिर ,श्रीकृष्ण मंदिर ,हनुमान मंदिर, महादेव मंदिर, नरसिंह मंदिर व मज्जिद मध्ये जाऊन पुष्पहार श्रीफळ फोडून पूजा करण्यात आली तसेच नरसिंह मंदिरास अकरा नारळाचे तोरण बांधण्यात आले शेकडोच्या संख्येने सकल मराठा समाज उपस्थित होता.

प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी
प्रगत किसान प्रिंट डिजिटल मीडिया