धाराशिव /वाशी
दिनांक-०१/०२/२०२३
वाशी-कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या १२१ व्या जयंती निमित्ताने “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण” या विषयावर मा.देविदास पाठक (आकाशवाणी व दूरदर्शन प्रसारभारती प्रतिनिधी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट सदस्य व दैनिक तरुण भारत जिल्हा प्रतिनिधी धाराशिव) यांचे व्याख्यान आयोजित केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बालाजी देवकते वाशी तालुका जेष्ठ नागरिक संघटना सचिव व दैनिक तरुण भारत चे तालुका प्रतिनिधी श्री.बळीराम दादा जगताप आणि वाशी तालुका जेष्ठ नागरिक संघटनाचे अध्यक्ष श्री.हारुण काझी उपस्थित होते.
या वेळी बोलताना मा.देविदास पाठक म्हणाले कि, के कस्तुरीनंदन समितीचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा मध्ये कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये नैसर्गिक साधन सामुग्री गृहीत धरून महाविद्यालयीन शिक्षणामध्ये कौशल्यावर आधारित १३३ कोर्सची निवड करण्यात आली आहे या मध्ये शेतीला पूरक शेतीची अवजारे दुरुस्ती शेडनेट उभारणी व दुरुस्ती मधू मक्षिका पालन, रेशीम उद्योग, साखर कारखान्यासाठी प्रशिक्षित कामगार तयार करणे कवड्याची माळ तयार करणे व खावा आणि इतर दुग्ध जन्य पदार्थ निर्मिती व प्रक्रिया इ कोर्स चा समावेश येत्या शैक्षणिक वर्षा पासून करण्यात येत आहे असे म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बालाजी देवकते म्हणाले कि सर्वांनाच सरकारी नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहे तेंव्हा कौशल्यावर आधारित शिक्षण घेऊन रोजगार मिळवावा असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अशोक पाटील यांनी केले सुत्रसंचलन प्रा.एम.डी उंदरे यांनी केले तर आभार प्रा.महेंद्रकुमार चंदनशिवे यांनी मानले.या कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थींनी उपस्थित होते.

संपादक विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी
वाचा प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया