धाराशिव/वाशी रविवार 4/2/2024
– कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची 121 वी जयंती महाविद्यालयात मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या हस्ते साजरी करण्यात आली. महाविद्यालयात कर्मवीर मामासाहेब यांच्या पुतळ्याचे दीपप्रज्वलन व पूजन करून लेझिम, जहांज पथक, वारकरी सांप्रयदायातील वेशभूषा, जुने खेळ अशा विविध उपक्रमांनी वाशी शहरात फेरी काढून मामांना अभिवादन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गंभिरे, नगरपंचायत वाशीच्या नगराध्यक्षा विजयाताई गायकवाड, उपनगराध्यक्ष मा.सुरेश कवडे, मा.भाई भगवानराव उंदरे, मा.मछिंद्र कवडे, माजी प्राचार्य डॉ.शारदा मोळवणे, डॉ.रविंद्र कठारे, नागनाथ नाईकवाडी आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षणप्रसारक कर्मवीर मामासाहेब जगदाळे मामा यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षण पोहचवण्यासाठी त्यांनी श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ हि संस्था स्थापली. मामांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ हि कल्पना स्वीकारली. मामांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली. असे उद्गार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गंभिरे यांनी यावेळी मांडले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अशोक पाटील यांनी केले सूत्रसंचलन प्रा.विश्वास चौधरी यांनी केले तर आभार प्रा.शाम डोके यांनी मानले.
या जयंतीनिमित्त कार्यक्रमात शहरातील ग्रामस्थ महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विध्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



मुख्य संपादक
विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी
वाचा प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया