धाराशिव वाशी
दिनांक 30 6 2024 रोजी रात्री 10.30 सुमारास वाशी तालुक्यातील पारगाव नजीक राष्ट्रीय महामार्ग NH 52 वर अज्ञात सात ते आठ दरोडेखोरांनी बीड कडे निघालेल्या कार वर दरोडा टाकला. याबाबत अधिक वृत्त असे की भास्कर मिसाळ हे सांगली येथे नातेवाईकाच्या लग्नसमारंभासाठी सहकुटुंब गेले होते . रविवारी लग्न समारंभ उरकून बीड चे रहिवासी असल्याने गावाकडे जात असताना पारगाव नजीक त्यांची कार आली असता महामार्गाच्या मधोमध लावलेल्या झाडात दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्यांनी वाहनाचा लोखंडी जॅक गाडी समोर टाकला यामुळे गाडीच्या चेंबरला ठोका लागून चेंबर फुटून ऑइल गेल्यामुळे गाडी बंद पडली यामुळे चालक मिसळ गाडीखाली उतरून बघत असताना दबा धरून बसलेले चोरटे यांनी गाडीतील मिसाळ यांच्या पत्नी अयोध्या मिसाळ (56) व बहीण उषा शेकडे (60) यांना मारहाण करत व अंगावरील दाग दागिने जबरीने हिसकावून घेत सुमारे 21 तोळे सोने व दोन मोबाईल, मनगटी घड्याळ,रोख रक्कम7000 लंपास केले. व पळ काढला याची माहिती वाशी पोलीस स्टेशन ला कळताच घटनास्थळी धाव घेतली. येरमाळा ते मांजरसुंबा या टप्प्यात सतत अशा प्रकारच्या चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे यामुळे येथून प्रवास करताना प्रवाशांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा वाशी पोलिसासमोर दरोडेखोरांचा तपास करून त्यांच्या मुस्क्या आवळण्याचे मोठे आव्हान आहे. फिर्यादी भास्कर बाबासाहेब मिसाळ हे सेवानिवृत्त प्राचार्य असून यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलिसात अज्ञात दरोडेखोरा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी भूम सपोनी सावंत साहेब ,पोलीस उपनिरीक्षक घुले साहेब यांनी भेट दिली. या घटनेचा अधिक तपास सपोनी सावंत साहेब हे करत आहे.
मुख्य संपादक विलास गपाट
🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी
प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया