धाराशिव वाशी=वाशी तालुक्यातील हातोला येथील वच्छला वंजारे वय 65 वर्षे या घरकाम करीत असलेल्या हातोला येथील महिलेचे घरातील सोयाबीन तांदूळ गहू वगैरे शेतमाल हा गावातील च एका 23 वर्षीय तरुणाने नामे लक्ष्मण खवले याने 14 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सदर महिलेच्या फिर्यादीवरून दिनांक 28 रोजी वाशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 331 (4),305 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुण्याचा तपास वाशी पोलीस स्टेशन पोलीस हेडकॉन्स्टेबल आर बी लाटे यांनी त्यांच्या गुप्त बातमी दारा मार्फत चौकशी करून. माहिती च्या आधारे सदर चोरी गेलेला मुद्देमाल पारगाव येथील शिवम ट्रेडर्स येथे विक्री स जात असल्याचे कळल्यानंतर वाशी पोलीस स्टेशन व कॉन्स्टेबल लाटे,पो कॉन्स्टेबल सय्यद, पो कॉन्स्टेबल साठे, पो कॉन्स्टेबल करडे यांनी सापळा रचून धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दिनांक 29/ 12 /2025 रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास पारगाव येथे विक्री स जाणारा चोरी गेलेला शेतमाल रिक्षा क्रमांक एम एच 23 एक्स 44 92 चा संशयावरून पाठलाग करून चौकशी केली असता वरील आरोपी सदर चोरीस गेलेला माल पारगाव येथील शिवम ट्रेडर्स येथे विक्री स घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले यावरून रिक्षासह आरोपीस मुद्देमालासह अटक करण्यात आली सदर तपास वाशी पोलिसांनी सदरील कारवाई धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर व उपविभागीय अधिकारी भूम श्री चोरमले व वाशी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बारा तासाच्या लावल्यामुळे तालुक्यात पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामगिरीची चर्चा होत आहे.
मुख्य संपादक = विलास गपाट
,🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र 🌻
निपक्ष निर्भीड व सकारात्मक बातम्या साठी फॉलो करा
प्रगत किसान लाईव्ह फेसबुक, ई न्यूज पोर्टल, प्रिंट मीडिया