इंदापूर येथील नरसिंह भैरवनाथ शुगर वर्क्स कारखान्याच्या पहिल्या गाळप हंगामास सुरुवात

Spread the love

धाराशिव=वाशी= सोमवार दिनांक 22 डिसेंबर रोजी इंदापूर येथील पूर्वीचा नरसिंह व आत्ताचा भैरवनाथ शुगर वर्क्स युनिट नंबर 7 या कारखान्याचा पहिला गळीत हंगाम तब्बल तेरा वर्षानंतर उसाची मोळी कारखान्याचे चेअरमन माननीय अनिल सावंत , तसेच व्हॉइस चेअरमन माननीय केशव सावंत यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत टाकून पुन्हा सुरू झाला.यावेळी कारखान्याची चेअरमन अनिल सावंत यांनी शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन वाढवून चांगल्या प्रतीचा ऊस कारखान्यात देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले. तसेच शेतकऱ्यांनी आता ऊस लागवड पद्धत ठिबक सिंचन पद्धतीने करावी जेणेकरून यापुढे मनुष्यबळ नसल्यामुळे ऊस तोडीचा प्रश्न निर्माण होत आहे यासाठी ऊस तोडीसाठी हार्वेस्टर चा उपयोग करण्या ची गरज आहे. तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव कसा देता येईल हेही माननीय आमदार तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करत आहोत. पुढे बोलताना ते म्हणाले धाराशिव जिल्ह्यात भैरवनाथ शुगर वर्क्स च्या चार कारखान्याच्या माध्यमातून आज पर्यंत सहा लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. तसेच आमदार तानाजीराव सावंत यांनी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून हा नरसिंह बंद पडलेला कारखाना तसेच तेरणा कारखाना सुरू केला व येथील शेतकऱ्यांची ऊसाची होणारी अडचण दूर केली. भविष्यात ही शेतकऱ्यांसाठी काम करण्याची सावंत साहेब यांची रणनीती आहेअसे म्हणाले. यावेळी माजी सभापती अण्णासाहेब देशमुख विभीषण खामकर , शिवसेना तालुकाप्रमुख सत्यवान गपाट , उप तालुका प्रमुख विकास तळेकर , युवा सेना जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब मांगले, नगरसेवक शिवहार स्वामी, रणजीत घुले, सरपंच गणेश गपाट यांच्यासह कारखान्याचे कर्मचारी पंचक्रोशीतील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक = विलास गपाट ,

🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र 🌻

निपक्ष निर्भीड व सकारात्मक बातम्या साठी फॉलो कराप्रगत किसान लाईव्ह फेसबुक, ई न्यूज पोर्टल, प्रिंट मीडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!