नरसिंह सहकारी साखर कारखाना लि. इंदापूर विक्रीस कोर्टाची स्थगिती

Spread the love

धाराशिव वाशी =2/7/2024 वाशी तालुक्यातील इंदापूर येथील

नरसिंह सहकारी साखर कारखाना लिमिटेड इंदापूर जिल्हा धाराशिव हा सहकारी कायद्यानुसार सहकारी रजिस्टर झालेला आहे. सदरील कारखान्याचे हजारो सभासद असून या कारखान्यावर सध्या सरकारी अवसायक आहे. पूर्व संचालक मंडळाने लीड बँक असलेल्या अपेक्स बँकेकडून कर्ज घेतले होते. अपेक्स बँकेचा परवाना रद्द झाल्यानंतर ते कर्ज पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक कडे वर्ग झाले. त्यानंतर पंजाब अँड महाराष्ट्र बँकेचे लायसन्स रद्द झाल्यानंतर ते एनपीए रेअर असेट री कंट्रक्शन कंपनीने विकत घेतले. रेअर असेट री कंट्रक्शन कंपनीने सदर कारखाना विक्रीसाठी 15/ 6 /2024 रोजी जाहीर नोटीस लोकसत्ता व इतर न्यूज पेपर मध्ये प्रसिद्ध केली होती. सदरील कारखाना विक्री नोटीस च्या नाराजीने कारखाना सभासद दिनकर कल्याण गपाट. यांनी मा जिल्हा कोर्टात दावा दाखल करून स्थगिती मागितली होती. अर्जदाराचे म्हणणे ऐकून मा जिल्हा न्यायालयाने आदेश देऊन दिनांक 29/ 6 /2024 रोजी रेअर असेट रीकंट्रक्शन कंपनीने दिनांक 15 /6 /2024 रोजी विक्री काढलेल्या नोटिषेनुसार दिनांक ३/७/२०२४ रोजी होणाऱ्या विक्रीस पुढील तारखे पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. यापूर्वीही रेअर असेट री कंट्रक्शन कंपनीने मे. सिताराम कारखाना यांना 4/4/2024 रोजी केलेला बेकायदेशीर भाडे तत्त्वावरचा करार मा डी आर टी कोर्ट छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 18/ 6 /2024 रोजी भाडेतत्त्वावरचा करार रद्द केला आहे. तत्पूर्वी पालकमंत्री धाराशिव तानाजीराव सावंत यांनी कारखाना ताब्यात घेऊन साफसफाई चालू केली होती. पण फाउंडर चेअरमन मा शंकर राव बोरकर यांच्या प्रयत्नाने स्थगिती आली आहे. अशी माहिती चेअरमन शंकरराव बोरकर यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे कोर्टाच्या मनाई आदेश सह दिली यामुळे मंत्री सावंत यांची नाचक्की झाल्याचे दिसून येत आहे.

मुख्य संपादक विलास गपाट

🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र

निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी

वाचा प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!