धाराशिव /वाशी =दिनांक 22 जून रोजी वाशी पोलीस स्टेशन प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे याच्या विरुद्ध एका महिलेच्या फिर्यादीवरून भूम पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना भूम येथील पारडी रोडवरील शासकीय विश्राम गृह समोरील तुळजाई निवास येथे घडली. तुळजाई निवास येथे रवींद्र शिंदे सुनिता गोविंद मस्के (बीड) महिलेसोबत राहत होते. फिर्यादी संभाजीनगरला राहत असून आरोपी सुनीता मस्के हिची मैत्रीण आहे. तिने फिर्यादीला काही कारणास्तव फोन करून भूम येथे बोलावले होते. 5 जून रोजी दुपारी तीनच्या दरम्यान आरोपी सुनीता मस्के बाजारात भाजी घेऊन येते म्हणून फिर्यादीस घरी ठेवून बाजारात गेली. यावेळेस आरोपी रविंद्र शिंदे घरीच होते. शिंदे यांनी फिर्यादीस पाणी पिण्यासाठी आणण्यास सांगितले पाणी आणण्यास गेल्यानंतर पाठी मागे जाऊन डावा हात पकडून आय लव यू असे म्हणत चुम्मा ( पप्पी) घेण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने शिंदे कडे रागाने बघत हात झटकला. नंतर सहा जून रोजी. आरोपी सुनीता मस्के हिने फिर्यादीस आरोपी रवींद्र शिंदे यांच्यासोबत एकाच बेडरूम मध्ये झोपा असे म्हणाली. त्यास नकार देतात या दोघांनी फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून आरोपी रवींद्र शिंदे याच्यावर भूम पोलीस ठाण्यात कलम 354, 354 A 504, 506,34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर आरोपी सुनीता मस्के बीड, व प्रवीण नावाचा चालक यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेमुळे भूम सह वाशी तालुक्यात खळबळ उडाली आहे पुन्हा एकदा वर्दीतील गुन्हेगारी समोर आली आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणय या ब्रीद वाक्याचे काय ? कायद्याचे रक्षकच सामान्य जनतेचे भक्ष क बनत आहेत याचे काय? असे नागरिकांतून बोलले जात आहे .अधिक तपास भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी हे करत आहे.
मुख्य संपादक विलास गपाट
🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी
वाचा प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया