अंतरवाली सराटी/ जालना=दिनांक 21/7/2024
हैद्राबाद गॅझेट घेऊन कन्नडची टीम अंतरवाली सराटी येथे दाखल
निजामकालीन असलेले दस्तावेज हैदराबाद गॅझेटची महाराष्ट्रातील एकमेव प्रत ज्येष्ठ अभ्यासक व तज्ञ
श्री डॉ रमेश सुर्यवंशी सरांकडे आहे. त्यानुसार जरांगे पाटील यांनी शासनाकडे हैदराबाद गॅझेट मंजूर करण्याची मागणी केली आहे. सन १८८१ च्या या गॅझेटमध्ये निजाम स्टेट मधील जिल्हे, तालुके आणि गाव यांची जातनिहाय लोकसंख्या दर्शवलेली आहे. त्यामध्ये मराठा या जातीचा उल्लेख कुणबी असा आहे. त्यामुळे हा दस्तावेज खूप महत्त्वाचा आहे.
शासनाने या दस्तावेजानुसार चर्चा करण्याची सकारात्मक तयारी दर्शवली आहे. त्यामुळे हा दस्तावेज तातडीने अंतरवाली सराटी येथे मागविण्यात आला होता .
हैदराबाद गॅझेट दस्तावेज घेऊन कन्नड टीम आज रात्री ९ः०० वाजता अंतरवाली सराटीत दाखल झाली व दस्तावेज सुपुर्द केले.
मराठा मार्ग
मुख्य संपादक
विलास गपाट
,🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी
प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया🌻