धाराशिव/ भूम =गुरुवार दिनांक 25 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता सकल मराठा समाज भूम यांच्यावतीने महायुती आणि महाविकास आघाडी यांचा अशुभ विवाह संपन्न झाला. याबाबत अधिकृत असे की. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्तेतील महायुती व विरोधातील महाविकास आघाडी कोणी तयार नाही. मराठा आरक्षणाच्या विरोधात हे दोघेही एकत्र येतात .म्हणून या दोघांचा प्रतिकात्मक अशुभ विवाह आंदोलन सुखाने नांदण्यासाठी करण्यात आला. या अनोख्या अशुभ विवाह सोहळ्यातील वधू वराची अनोखी नावे वधूचे नाव=दगलबाज महायुती तर वराचे नाव=निष्ठूर महाविकास आघाडी . यावेळी हजारोच्या संख्येने सकल मराठा , महिला बंधू भगिनी वराडी म्हणून उपस्थित होते यावेळी प्रतीकात्मक वधू=वरांना हळदी समारंभ, अंघोळ ,शहरातून बँड बाजा लावून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. आपर्यंत अशी वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रात आंदोलन करण्यात आली पण आता तरी सरकार बोध घेऊन मराठा समाजाला हक्काचे आरक्षण देऊन न्याय देईल काय?.
मुख्य संपादक विलास गपाट
🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी
वाचा प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया🌻