मुंबई=दिनांक 29 जुलै 2024 रोजी याबाबत शासन निर्णय घेण्यात आला. याबाबत अधिक वृत्त असे की दिनांक 5 जुलै रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी थोडीशी खरीप 2023 मधील कापूस व सोयाबीन उत्पादनाचा राज्याच्या आर्थिक घडामोडीत मोठा वाटा आहे. मागील हंगामात आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे व अन्य काही कारणामुळे भावात घसरण होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरी प पणन हंगाम 2023 /24 साठी. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 प्रमाणे दोन हेक्टर पर्यंत अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेच्या अनुषंगाने दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट(1000) रुपये मिळणार आहेत. तर दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दोन हेक्टर च्या मर्यादेपर्यंतच अनुदान मिळणार आहे असा शासन निर्णय 29 जुलै रोजी घेण्यात आलेला आहे.
हे अनुदान कोणास मिळणार? ज्या ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 हंगामामध्ये ईपीक पाहणी पोर्टल द्वारे सोयाबीन व कापूस या पिकाची पीक पहाणी केलेली आहे हे शेतकरी या अनुदानासाठी पात्र राहतील असे शासन निर्णयात अट घालण्यात आलेली आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांची काही तांत्रिक अडचणी ,पोर्टल अडचणी मुळे ई पीक पहानी झालेली नाही असे शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहेत.
मुख्य संपादक विलास गपाट
🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्या साठी
वाचा प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया🌻