धाराशिव /वाशी=गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी मराठा हृदय सम्राट क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाशी तालुक्यात विविध ठिकाणी प्रशालेमध्ये मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप तसेच शालेय स्पर्धा घेण्यात आल्या. तर इंदापूर येथे सकल मराठा समाज त्यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरामध्ये 25 रक्तदात्यांनी रक्त देऊन सामाजिक काम केले तसेच सरमकुंडी येथेही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर बावी येथील सकल मराठा बांधवांनी ट्रॅक्टर रॅली काढून वाशी तहसीलवर मोर्चा नेला यामध्ये वाशी शहर येथील सकल मराठा बांधव मराठा सेवक सहभागी होऊन मराठा समाजाला 50% च्या आतून व ओबीसीतूनच आरक्षण मिळाल पाहिजे यासाठी तहसीलदार लांडगे साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी हजारोच्या संख्येने सकल मराठा समाज उपस्थित होता यावेळी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कोण म्हणतं देत नाही ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टी नाही देण्यात आल्या. दरम्यान अंतर्वली येथून मनोज दादा जरांगे यांनी महाराष्ट्रात एक ऑगस्ट रोजी वाढदिवसानिमित्त जागतिक रेरेकॉर्ड ब्रेक रक्तदान महाराष्ट्रात झाल्यामुळे सर्वांचे आभार व कौतुकी मानले या सामाजिक कामामुळे अनेकांचे प्राण वाचणार आहे त्यामुळे दादाने सर्वांचे कौतुक केले.

मुख्य संपादक विलास गपाट
🌻प्रगट किसान प्रगत राष्ट्र
निर्भिड व सकारात्मक बातम्या साठी वाचा
प्रगत किसान न्यूज डिजिटल प्रिंट मीडिया🌻