धाराशिव/ वाशी=गुरुवार दिनांक 15/8/2024 रोजी इंदापूर येथील जिल्हा परिषद प्रशाला व प्राथमिक शाळा संयुक्त स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गावातून प्रभात फेरी काढून प्रशालेत विविध स्पर्धा परीक्षा, खेळामध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार ही करण्यात आला. यावेळी इयत्ता दहावी मध्ये प्रथम समृद्धी चक्रधर गपाट, द्वितीय, कीर्ती गणेश गायके , आणि प्रतिज्ञा पांडुरंग कवडे तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थिनींचा शिवाजी रामराव गपाट यांनी (भऊ) यांनी प्रशालेस कै.सुब्राव गपाट यांच्या स्मरणार्थ रुपये दहा लाखाची देणगी प्रशालेस दिली होती या देणगीच्या व्याजाच्या रकमेतून गेल्या वर्षीपासून अनुक्रमे प्रथम क्रमांक 25000, द्वितीय 15000,तृतीय क्रमांक दहा हजार,पटकीवणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत व्हावी या विद्यार्थ्यापासून प्रेरणा घ्यावी ,शाळेची गुणवत्ता वाढावी या हेतूने यांनी प्रशालेत देणगी दिली होती. समस्त इंदापूर गावकऱ्याकडून भाऊंचा स पत्नीक सन्मान ही करण्यात आला होता. यावेळी नरसिंह सहकारी साखर कारखाना चेअरमन मा शंकरराव बोरकर यांनी ही त्यांची मुलगी स्वाती बोरकर हिची धाराशिव जिल्हा युवती महिला शिवसेना ( उबाठा) पदी निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद प्रशाला व प्राथमिक शाळा यांना दोन संगणक व प्रिंटर भेट दिले. तर पालकमंत्री मा.ना.तानाजीराव सावंत यांनीही प्रशालेस डिजिटल बोर्ड भेट दिला. यावेळी सरपंच गणेश गपाट यांनीही सन 2024 पासून ग्रामपंचायत कार्यालय इंदापूर तर्फे शिक्षका साठी शिक्षक रत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली. तर दिपक सुरेश पारडे हे शाळेस पिण्याचा पाण्यासाठी बोरवेल व मोटार देणार आहेत. तर पुष्कराज गपाट व मित्र मंडळ यांनी शाळेत रंगोटी साठी एक लाख दहा हजार रुपयांचा निधी दिला.अशा सर्व शिक्षण प्रेमी नागरिकांनी शाळेसाठी योगदान देऊन चांगली शाळा होऊन चांगले विद्यार्थी घडावेत यासाठी प्रयत्न करण्यात आला. यावेळी सरपंच गणेश गपाट, चेअरमन शंकरराव बोरकर, जिल्हा युवती अध्यक्ष स्वाती बोरकर, शिवाजी भऊ सह पत्नीक, ऍड सत्यवान गपाट, दुबई येथे नोकरीस असणारे दिपक पारडे,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष हिंदुराज गपाट, पुष्कराज गपाट, राजपाल गपाट, अमित गपाट, रामेश्वरकाकडे ,प्रशालेचे मुख्याध्यापक भाईगुडे सर, माने सर, बळीराम जगताप सर, शिंदे सर, कुंभार सर , अंगणवाडी सेविका, अशा कार्यकर्ते ,यांच्यासह नागरिक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


मुख्य संपादक विलास गपाट
🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यासाठी
वाचा प्रगत किसान न्यूज डिजिटल प्रिंट मीडिया🌻
जि. प शाळेस देणगी? शाळेची गुणवत्ता कधी नागरिकांनी तपासली का? शाळेचे शिक्षक मध्ये साने गुरूजी चे विचार व कर्मवीर भाऊराव सारखी त्यागी व्रती तपासली का?