कोलकाता येथे सरकारी महाविद्यालय हॉस्पिटल मध्ये महिला डॉक्टर वर अत्याचार व हत्या याचा निषेध धाराशिव युवा सेना च्या वतीने कॅन्डल मार्च काढून करण्यात आला

Spread the love

धाराशिव=शनिवार 17 /8 /2024

“कँडल मार्च” 🕯️“Save the Doctors”.
कोलकाता येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय ,हॉस्पिटल येथील घडलेला अमानुष बलात्कार करुन हत्या केली याचा निषेध म्हणून युवासेनेच्या वतीने “कँडल मार्च” आयोजित केला होता तरी सर्व स्तरातील महाविद्यालयातील मेडिकल कॉलेज ,नर्सिंग कॉलेज येथील विद्यार्थी व विद्यार्थीनी यानी हिरीरीने सहभागी झाले व त्यांचा राग या माध्यमातून त्यांनी व्यक्त केला ,हा मार्च राजमाता जिजाऊ चौक ते कलेक्टर ऑफिस पर्यंत झाला,कलेक्टर ऑफिस च्या गेट वरती सर्वांनी कँडल लाऊन पीड़ीतेस श्रद्धांजलि वाहिली.
यावेळी विभागीय सचिव अक्षय ढोबळे ,महिला शिवसेना जिल्हाप्रमुख शामलताई वडणे,धाराशिव युवतीसेना विस्तारक स्वाती बोरकर,लातूर युवतीसेना विस्तारक मनीषा वाघमारे,सामाजिक कार्यकर्त्या जिनत प्रधान ,सोशल मीडिया राज्य समन्वयक प्रशांत जगताप,युवासेना उपजिल्हाप्रमुख राणा बनसोडे,युवासेना जिल्हा सचिव शिवयोगी चपने, युवासेना जिल्हा सहसचिव अजय धोंगडे,कॉलेज कक्ष जिल्हा प्रमुख अविनाश शेरखाने, उपतालुक़ा प्रमुख राकेश सूर्यवंशी ,संदीप गायकवाड,सत्यजीत पडवळ,सुरेश गवळी ,युवतीसेना उपजिल्हाप्रमुख भाग्यश्री रणखांब आदि उपस्थित होतेहा कँडल मार्च यशस्वी करण्यासाठी उपस्थित राहीलेल्या सर्व विद्यार्थी ,शिक्षक,नर्स,सामान्य नागरिक,महिला,युवती,व युवासैनिक आदि सहभागी होते.

मुख्य संपादक विलास कपाट

प्रगत किसान प्रगत राष्ट्र

निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी

वाचा प्रगत किसान न्यूज डिजिटल प्रिंट मीडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!