सिबिल च्यl नावाखाली शेतकऱ्यास पीक कर्ज देण्यास स्टेट बँक ऑफ इंडिया वाशी ची टाळा टाळ
वाशी=दि.28/8/2024
या बाबत अधिक वृत्त असे की,
राज्य सरकारने पिक कर्जासाठी कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांची सिबिल ची अट लादून कर्ज प्रकारने मार्गी न लावल्यास कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. दि १८ जुलै २०२४ रोजी जिल्हा नियोजन समिती,धाराशिव येथे बैठक घेण्यात आली त्या बैठकीत पीक कर्ज कमी वाटप असणाऱ्या व सिबिलची अट टाकून कर्ज प्रकरने रद्द करणाऱ्या बँकांवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश पालकमंत्री डॉक्टर सावंत यांनी दिले होते त्यानुसार जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओम्बासे यांनी गुन्हा नोंद केला आहे अशी बातमी आजच्या वृत्तपत्रात आलेली आहे डिसेंबर 2020 मध्ये माझ्या आईच्या नावाने (जयश्री प्रकाश उंद्रे) व माझ्या नावाने संयुक्त पीक कर्ज घेतले होते नंतर सातबारा वरील क्षेत्राचे खाते फोड केल्यामुळे पूर्ण रक्कम भरूनच पुन्हा कर्ज द्यावे लागेल अशी शाखाधिकारी यांनी सांगितले माहित महिनाभरापूर्वी रक्कम जमाजमा करून २,६४,०००/- रुपये एवढी रक्कम भरली नंतर माझ्या नावाने (राकेश प्रकाश उंदरे) व आईच्या नावाने (जयश्री प्रकाश उंदरे) पिक कर्ज प्रकरण दाखल केली त्यात माझ्या नावाने CIBIL CLEAR असल्यामुळे पीक कर्ज प्रकरण लवकर मंजुरी झाले मात्र आईच्या नावाने सिबिल मध्ये मायक्रो फायनान्स चे १६६९५/- रुपये राईट ऑफ रक्कम दाखवत होती ती कंपनी बंद पडलेली होती मात्र त्याबाबत अनेक जणांशी चौकशी करून ती रक्कम भरली मात्र रक्कम भरलेल्या पावतीवर व CIBIL मध्ये दाखवत असलेल्या फायनान्स च्या नावात तफावत असल्याकारणाने कर्ज प्रकरण त्रुटीमध्ये आले नंतर पुन्हा त्याबाबत चौकशी करून व त्या अकाउंटची स्टेटमेंट जोडले तरी धाराशिव शाखेतील अधिकारी कर्ज प्रकरण मध्ये त्रुटी काढत आहेत महिनाभरापासून चार ते पाच वेळा वाशी ते धाराशिव येजा करण्यात मला मानसिक त्रास झाला आहे याला कंटाळून जोपर्यंत माझी पीक कर्जाची फाईल (जयश्री प्रकाश उंदरे) या नावाने होत नाही तसेच संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत दिनांक ०२/०९/२०२४ पासून एसबीआय बँकेसमोर अमरण उपोषणास बसणार आहे माझ्या जीवाला काही झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित अधिकारी व प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी.
मुख्य संपादक = विलास गपाट
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी
वाचा प्रगत किसान न्यूज
डिजिटल प्रिंट मीडिया