मंत्री तानाजीराव सावंत यांनी शेतकऱ्याची काढली औकात. सर्वत्र टीकेची झोड
धाराशिव /वाशी=दिनांक 30/ 8 /2024 शुक्रवार रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांचा वाशी भूम परंडा मतदारसंघात गाव भेटी व विविध विकास कामाचे पहानी दौरा. सदर दौरा हा वाशी तालुक्यातील पिंपळगाव कोठाळा येथे आला असता मंत्री सावंत हे गावकऱ्याशी व शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना गावातील काही शेतकऱ्यांनी व शेतकरी श्रीधर कुरुंद नदीवरील बंधारा व विविध विकास कामाच्या बाबतीत प्रश्न विचारले यावेळी सावंत यांनी उत्तर न देता सदर वयस्कर शेतकऱ्यास सुपारी घेऊन प्रश्न विचारता असे म्हणत त्यांची औकात काढली यामुळे तेथील गावकरी व शेतकरी चिडले व कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना व संविधान पदावर असताना अशा पद्धतीने शेतकऱ्यास भाषा वापरल्यामुळे जिल्ह्यातून व संपूर्ण महाराष्ट्रातून परत एकदा सावंत यांच्यावर वाचाळ वीर म्हणत टीकेची झोड उठवली आहे.
मुख्य संपादक विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातमीसाठी
वाचा प्रगत किसान न्यूज
डिजिटल प्रिंट मीडिया