तेरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे 100 खटांचे विशेष बाब म्हणून उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धनास मान्यता
धाराशिव वाशी=सोमवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा. प्राध्यापक डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या प्रयत्नाने बऱ्याच दिवसापासून शासनाच्या विचाराधीन असलेल्या तेरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शंभर खटाचे जिल्हा उप रुग्णालय श्रेणी वर्धन करण्यास मान्यता मिळाली. यामुळे तेरखेडा सह परिसरातील रुग्णांना तातडीची सेवा मिळण्यास मदत होणार आहे. तसेच तेरखेडा गाव फटाका उद्योगासाठी प्रसिद्ध आहे येथे फटाक्याचे कारखाने तसेच फटाका स्टॉल भरपूर प्रमाणात आहे. बऱ्याच वेळा कारखान्यामध्ये स्पोट होऊन कामगार जखमी घडल्याच्या किंवा मरण पावल्याच्या घटना त्यांना तातडीचा उपचार न मिळाल्यामुळे बऱ्याच वेळ घडलेली आहे . या सुविधेमुळे तातडीचे उपचार मिळणार आहे तसेच तेरखेडा गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे सतत अपघात घडत असतात या व्यक्तींना आपण याचा फायदा होणार आहे. ही सुविधा तातडीने मिळवून दिल्याबद्दल मंत्री तानाजीराव सावंत यांचे तेरखेडा गावा सह परिसरातील नागरी आणि आभार व्यक्त केले.
मुख्य संपादक=विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी
वाचा प्रगत किसान न्यूज
डिजिटल प्रिंट मीडिया