अंतरवाली/ वडीगोद्री=मंगळवार10 सप्टेंबर रोजी अंतरवाली येथे सोलापूर धाराशिव जिल्ह्याची घोंगडी बैठक नियोजनासाठी ची बैठक बोलावली होती यामध्ये क्रांती सूर्य मनोज दादा यांनी आरक्षणा संबंधित येणाऱ्या अडीअडचणीसाठी व मराठा समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी गाव पतळीवर मराठा सेवक 20 ते 30 जणांची. फौज निर्माण करा असा आदेश उपस्थित सकल मराठा बांधवांना देण्यात आला. यावेळी बोलताना दादा म्हणाले आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर सभा घेतल्या, रॅली काढल्या तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर मोठ मोठ्या सभा घेतल्या. पण मराठा समाजाच्या निघालेल्या नोंदी, निघालेले प्रमाणपत्र , यांची व्हॅलिडीटी न होणे ज्या ठिकाणी नोंदणी निघाल्या नाहीत त्या ठिकाणी नोंदी तपासणे, ज्यांना आरक्षण मिळाले आहे नोकरीत फायदा झाला अशांची नोंद ठेवणे, यासाठी गाव पातळीवर काम होत नसल्यामुळे एवढा आपला लढा मोठा होऊन अडचणी निर्माण होत आहे यासाठी ग्राउंड लेव्हलवर गाव स्तरावर या फौज च्या माध्यमातून तालुका ,जिल्हा राज्य, लेव्हलवर काम होणार आहे यासाठी या फौजांची निर्मिती करणे आवश्यक आहे. ही फौज आरक्षण नोकरी यासाठीच नव्हे तर शेतकऱ्यांचे ,गावातील मराठा बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार आहे असे यावेळी दादांनी सांगितले.
मुख्य संपादक =विलास गपाट
🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यासाठी
वाचा प्रगत किसान न्यूज🌻
डिजिटल प्रिंट मीडिया