धाराशिव परंडा
आरोग्य मंत्री माननीय तानाजीराव सावंत यांचे पुतणे तथा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरावर गुरुवारी रात्री बारा वाजून 37 मिनिटांनी अज्ञात दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी घरावर गोळीबार केला. व निघून गेले यामुळे धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शनिवार दिनांक 14 रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांची सभा होणार आहे. या घटनेमुळे वाशी भूम परंडा मतदारसंघात खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत सुरक्षा रक्षक यांनी आंबे पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पण या घटनेचे कारण कळू शकले नाही नेमका गोळीबार कशामुळे करण्यात आला? पोलीस तपासातच नंतर स्पष्ट होईल.

मुख्य संपादक विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी
प्रगत किसान न्यूज डिजिटल प्रिंट मीडिया