वाशी येथे खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

धाराशिव वाशी=बुधवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी वाशी येथील बालाजी मंगल कार्यालयात राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव चे पालकमंत्री माननीय डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून गौरी गणपती निमित्त खास लाडक्या बहिणीसाठी खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर व बाल गायिका सह्याद्री मळेगावकर या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. या कार्यक्रमात विजेत्यांना रेफ्रिजरेटर, टीव्ही, वॉशिंग मशीन, पिठाची गिरणी, शिलाई मशीन अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय , चौथे आणि पाचवे बक्षीस ठेवण्यात आली होती यात प्रथम क्रमांक तेरखेडा येथील सौ.कोमल नारायण पोळ यांनी रेफ्रिजरेटर पटकावला .द्वितीय क्रमांक सरमकुंडी येथील सौ. राधा गोकुळदास गायकवाड यांनी दूरचित्रवाणी (टीव्ही ).तृतीय क्रमांक सौ. प्रीती सुयोग पवार वॉशिंग मशीन, चतुर्थ क्रमांक सौ.सलोनी सुयश सुकाळे पिठाची गिरणी, पाचवा क्रमांक सो. राजश्री आप्पासाहेब शेरकर शिलाई मशीन पटकावली. तर उपस्थित सर्व महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले यावेळी महिलांनी मनोरंजनासह बक्षीसांचाही आनंद लुटला. उपस्थित महिलांनी सावंत साहेबांनी राबविलेल्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले व सावंत साहेबांच्या माध्यमातून मतदार संघातून चांगले उपक्रम राबवले जात आहेत खास करून महिलांसाठी बचत गटांना मदत. शिवजल क्रांती, शेत रस्ते , आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत.या कार्यक्रमास धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक केशव सावंत, बाळासाहेब मांगले, नागनाथ नाईकवाडी, शिवहार स्वामी, प्रवीण गायकवाड, सतीश शेरकर, प्रकाश शेटे, लायक तांबोळी ,विकास तळेकर, सत्यवान गपाट, राजा कोळी यांच्यासह महिला व कार्यकर्ते बहु संख्येने उपस्थित होते.

oppo_0

मुख्य संपादक विलास गपाट

🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र

निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी वाचा
प्रगत किसान न्यूज
डिजिटल प्रिंट मीडिया 🌻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!