इंदापूर येथे सकल मराठा बांधवांचे रस्ता रोको आंदोलन
धाराशिव वाशी
सोमवार दिनांक 23 9 2019 रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर इंदापूर /बोरी पाटी येथे सकल मराठा बांधव इंदापूर ,खानापूर, गोलेगाव ,बोरी, तेरखेडा, गोजवाडा यांच्या वतीने अंतरवाली सराटी येथे मनोज दादा जरांगे पाटील यांचे सात दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे हे उपोषण शासनाने लवकरात लवकर मागण्या मान्य करून संपवावे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रकृती खालावत आहे. या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा आंदोलक बापू कदम, विलास गपाट, अनिल पाटील यांनी मराठा आरक्षणावर मार्गदर्शन केले . मनोज दादांच्या आदेशानुसार आंदोलन शांततेत पार पडले . वाशी तहसीलचे तहसीलदार मां .मेहेत्रे साहेब यांना सकल मराठा बांधवांच्या वतीने मराठा आरक्षण मागणीचे निवेदन देण्यात आले .यावेळी माननीय तहसीलदार यांनी आपल्या मागण्या लवकरात लवकर शासनाला पोहोचवतो असे सांगितले . वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या . या आंदोलनात सकल मराठा बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.सर्व पोलीस प्रशासनाने आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.यावेळी वाशी पोलीस स्टेशन,एपीआय सावंत साहेब, पोहे कॉन्स्टेबल, नसीर साहेब, यादव साहेब, जाधवर साहेब, अवसरे साहेब यांनी चोक बंदोबस्त लावला होता.

मुख्य संपादक विलास गपाट
🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी वाचा
प्रगत किसान न्यूज
डिजिटल प्रिंट मीडिया 🌻