इंदापूर उपकेंद्राचे प्राथमिक आरोग्य केंद्रात श्रेणी वर्धन मंत्री सावंत यांच्याकडे होती मागणी

Spread the love

इंदापूर आरोग्य उप केंद्राचे प्राथमिक आरोग्य केंद्रात श्रेणी वर्धन. आरोग्यमंत्र्याकडे केली होती मागणी
धाराशिव वाशी =दिनांक 24 9 2024

वाशी तालुक्यातील इंदापूर येथे आरोग्य उपकेंद्र होते या उपकेंद्रासाठी मागील सात आठ वर्षे पूर्वी सुसज्ज इमारत ही बांधण्यात आली होती पण आज तगायत या उपकेंद्राचे अधिकृत उद्घाटना अभावी धुळखात पडले होते. इंदापूर येथे तीन आरोग्य सेविका एक बी एम एस डॉक्टर व एक मलेरिया डॉक्टर अशी कर्मचारी संख्या असताना गेल्या एक वर्षापासून एक ही कर्मचारी या उपकेंद्रात नाही यामुळे गावातील वयोवृद्ध महिला पुरुष यांना आरोग्य सेवा भेटत नव्हती फक्त लहान मुलांचे डोस या ठिकाणी दिले जात होते.
इंदापूर येथे उपकेंद्राचे श्रेणीवर्धन करून प्राथमिक आरोग्य केंद्र करावे यासाठी ग्रामपंचायत कार्यालय इंदापूर सरपंच गणेश गपाट व सर्व सदस्य यांनी ग्रामसभेत 17 जुलै रोजी ठराव घेऊन आरोग्यमंत्री माननीय तानाजीराव सावंत यांच्याकडे मागणी केली होती. तसेच शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख सत्यवान गपाट यांनीही आरोग्यमंत्र्याकडे मागणी करून पाठपुरावा केला होता या दोन्हीही मागण्याचi विचार करून आरोग्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करून घेतली. दिनांक 23 सप्टेंबर रोजी यास मंजुरी मिळाली. यामुळे गावकऱ्यांना तसेच परिसरातील गोजवाडा, बोरी ,खानापूर , गोलेगाव, आदी गावांना आरोग्याच्या सुविधा तातडीने मिळणार आहेत. युती शासन(97=98) पहिल्यांदा सत्तेवर आल्यावर इंदापूर येथे येणारे हे प्राथमिक आरोग्य केंद्र राजकीय पुढाऱ्यांनी जोर लावल्यामुळे पाथरूड येथे गेले, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात हेच आरोग्य केंद्र तेरखेडा येथे गेले होते. इंदापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केल्यामुळे आरोग्यमंत्र्याचे परिसरातील सर्व गावकऱ्यांच्या व इंदापूर गावाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

मुख्य संपादक विलास गपाट

🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र

निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी वाचा
प्रगत किसान न्यूज
डिजिटल प्रिंट मीडिया 🌻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!