धाराशिव परंडा=गुरुवार दिनांक 3/10/2024 वाशी भूम परांडा मतदारसंघाचे शिवसेना उ बा ठा गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या )पाटील यांची पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने बुधवार दिनांक 2 /10/ 2024 रोजी रात्री प्राणज्योत मालवली. ज्ञानेश्वर पाटील हे धडाडीचे कार्यकर्ते होते सुरुवातीला कमांडर जीपमध्ये प्रवासी वाहतूक करणारे पाटील परंडा तालुका शिवसेनाप्रमुख ते 1995 च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना शिवसेना-भाजप युती तर्फे आमदारकीचे उमेदवारी मिळाली व काँग्रेसचे उमेदवार तथा आमदार महारुद्र बप्पा मोठे यांचा पाच हजार मतांनी पराभव करीत शिवसेनेचा वाशि, भूम,परंडा तालुक्यात भगवा फडकला. त्यानंतर 99 च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार तात्यासाहेब गोरे यांचा पराभव करत दुसऱ्यांदा आमदारकी मिळवली. या कारकिर्दीमध्ये वाशी भूम परंडा तालुक्यातील अनेक कामे केली व जनसामान्यात त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण झाली. लोक त्यांना आदराने तात्या असे म्हणत बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असणारे ज्ञानेश्वर तात्या पाटील यांनी वाशी भूम परंडा तालुक्यात शिवसेना वाढवली आणि शिवसेनेचा बालेकिल्ला निर्माण केला. 2024 च्या निवडणुकीत महारुद्र मोठे यांचे चिरंजीव राहुल मोठे हे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे रिंगणात उतरले व त्यांचा पराभव झाला. त्यानंतरही वाशी ,भूम,परांडा मतदार संघात एक निष्ठेने काम केले .पुढे 2019 मध्ये तानाजीराव सावंत यांच्या रूपाने या मतदारसंघात एन्ट्री झाली. त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली. यावेळी ही पक्षाचे निष्ठेने काम केले. तानाजी सावंत यांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा आहे. पुढे तानाजी सावंत शिंदे गटात गेले तरीही या कट्टर बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी शिवसेना सोडली नाही आणि बुधवारी रात्री शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला त्यांच्या जाण्याने मतदारसंघात पोकळी निर्माण झाली आहे.परंडा येथे गुरुवारी राहत्या घरी पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले होते . नंतर दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने शिवसैनिक लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी अखेरचा जय महाराष्ट्र करण्यासाठी उपस्थित होते.

