बीड /नारायण गड=शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी माननीय संघर्ष योद्धा क्रांतीसुर्य मनोज दादा जरांगे पाटील यांच्या विचाराने व नारायण गडाचे महंत तथा गुरुवर्य शिवाजी महाराज यांनी बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायण गड येथे पारंपारिक दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. या ऐतिहासिक व अभूतपूर्व अशा दसरा मेळाव्यास सर्व जाती धर्माच्या लोकांचा न भूतो न भविष्यती असा करोडोच्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रा च्या कान्या कोपऱ्यातून जनसागर उसळला होता. या ठिकाणी भक्ती आणि शक्तीचा संगम लोकांना पाहावयास मिळाला. खास बनवलेल्या रथातून मराठा योद्धा जरांगे पाटील व नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांची मिरवणूक सभास्थळापर्यंत काढण्यात आली . व्यासपीठावरील भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास प्रथम पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जरंगे पाटील यांनी गुरुवर्य शिवाजी महाराज यांचा तुळशी भला मोठा हार घालून स्वागत केले तर महाराजांनी पण जरांगे पाटील यांचे गडाच्या वतीने तुळशीचा हार घालून स्वागत केले गुरु शिष्याचा सत्कार सोहळा जन समुदाय कौतुकाने पहात होता.नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी प्रबोधन करताना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चाललेल्या लढ्याला रायणगडाचा पाठिंबा व आशीर्वाद असल्याचे सांगितले. यावेळी क्रांतीसुर्य संघर्ष योद्धा मनोज जागे पाटील यांनी जनसमुदाया पुढे नतमस्तक होऊनअभिवादन केले. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले मी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं एवढा मोठा जनसमुदाय एका हाके वर दसरा मेळाव्यासाठी हजेरी लावेल. तुमचे मनापासून आभार तुमची ताकद एकजूट अशीच राहू द्या. मी तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही तुम्ही पण माझ्या शब्दाच्या पुढे जायचं नाही आपल्या गरजवंत गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय एक इंच ही मागे हटणार नाही असा शब्द मराठा समाजाला दिला माझे संपूर्ण जीवन मी मराठा समाजासाठी अर्पण केलेले आहे. यावेळी मागील चार दिवसापूर्वी सरकारने 15 जाती ओबीसीमध्ये घालण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला व उत्पन्नाची मर्यादा आठ लाखावरून पंधरा लाख केली. यावर मनोज दादा यांनी जे नेते मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय असे म्हणत होते मग आता 15 जाती घातल्या त्यावेळेस गप्प का? मराठा समाजाला ओबीसी आरक्षणा मध्ये घालण्यासाठी महाविकास आघाडीची लेखी आणा म्हणणारे आता कुठे गेले? आता आणले का लेखी असा प्रश्नही जरागे पाटील यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना विचारला . मराठ्यांची जाणीवपूर्वक पिळवणूक व त्रास दिला जात आहे. मराठांचे ओबीसी मध्ये जाण्याचे सर्व पुरावे असताना देखील सरकार जाणून बुजून आरक्षण देत नाही. सरकार जातिवाद करत आहे एका जातीला वेगळा न्याय आणि एका जातीला वेगळा न्याय ही सरकारची पालकत्वाची भूमिका नाही. समाजाने याचा आता गांभीर्याने विचार करावा. सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी आरक्षणाचा निर्णय घ्यावा अन्यथा मराठे सुपडा साफ करतील. असा सूचक इशाराही सरकारला यावेळी जरांगे पाटील यांनी दिला. यावेळी उपस्थित मराठा समाज बांधवाकडून वचन घेण्यात आले. जो भी निर्णय घेण्यात येईल त्यात समाधानी एकजुटीने पाठिंबा द्यावा याशिवाय आता मराठ्यांना पर्याय नाही. नारायण गडावर व पायथ्याशी 500 एकर जागेवर वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली होती पण तीही अपुरी पडली आणि तब्बल वीस ते बावीस किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या मराठी प्रचंड ताकती ने गडावर आले होते.

मुख्य संपादक विलास गपाट
🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी वाचा
प्रगत किसान न्यूज
डिजिटल प्रिंट मीडिया 🌻