माजी मंत्री सावंत यांनी भरला उमेदवारी अर्ज प्रचंड शक्ती प्रदर्शन

Spread the love

धाराशिव/ भूम=दिनांक 19/ 10 /2024 मंगळवार रोजी वशी भूम परंडा 243 मतदार संघ महायुतीचे उमेदवार माननीय प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महिला सह पुरुष लाखोच्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी झालेल्या सभेत काय म्हणाले सावंत

2019 च्या निवडणुकीत भूम येथील सभेत तानाजीराव सावंत यांनी वर्ष भूम परंडा मतदारसंघात मराठावड्याच्या हक्काचे 21 टीएमसी पाणी आणल्याशिवाय पाय ठेवणार नाही. त्याची आठवण करून देताना येत्या मार्च/ एप्रिल महिन्यापर्यंत धाराशिव जिल्ह्याचे हक्काचे सात टीएमसी पाणी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना वाशी भूम परंडा मतदारसंघात दीड ते दोन हजार कोटी रुपयाचा महाराष्ट्रात सर्वाधिक निधी विविध विकास कामासाठी आणल्याचे सांगितले. तसेच विरोधकावर टीका करताना दीड हजार कोटी वर किती शून्य आहेत याचा अभ्यास करावा आणि नंतर विकास कामाच्या गप्पा मारावा अशी माजी आमदार राहुल मोटे त्यांच्यावर नाव न घेता टीका करण्यात आली. वाशिम भूम परंडा प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल मध्ये 35 ते 40 कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांगताना वाशी आणि साठी एमआयडीसी आणल्याचे सांगितले. या एमआयडीसी मध्ये येणाऱ्या काळात शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव मिळावा दुधाला भाव मिळावा यासाठी सोयाबीन प्रक्रिया उद्योग तसेच दुधासाठी पाच लाख लिटरचा मोठा प्लांट उभा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे या मतदारसंघातील हजारो तरुणांना उद्योग, नोकरी मिळणार असल्याचे सांगितले. वाशी शहरासाठी सव्वाशे कोटी बोंब शहरासाठी सव्वा 200 कोटी परंडा शहरासाठी पावणेदोन कोटी विकास कामासाठी आणल्याचेही त्यांनी सांगितले. शिवजयंतीच्या माध्यमातून सातशे किलोमीटर नाला नदी खोलीकरण केले यामुळे या भागातील पाण्याचे पातळी वाढून शेतकऱ्यांना विकास पाणी देण्यास उपलब्ध झाले. हा आमदार तानाजी सावंत तुमचा सेवक म्हणून वाशी भूम परंडा मतदारसंघात साठी यापुढे तिपटीने निधी आणणार असून या भागाचा काय पडलात करणार आहे. यावेळी बोलताना त्यांनी हा उपस्थित जनसमुदाय सांगतोय गुलाल आपलाच असणार एक लाखाच्या पुढे निवडून येणार आणि 23 तारखेला गुलाल घेऊन या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!