धाराशिव/भूम=सोमवार दिनांक 28/ 10/ 2024 रोजी मराठा सेवक प्रशांत चेडे यांनी मराठा योद्धा क्रांतीसुर्य माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार कुठलाही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मोजकेच सकल मराठा बांधव उपस्थित होते. मराठा सेवा प्रशांत चेडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे वाशी तालुक्यातून बऱ्याच दिवसात यांच्या रूपाने आमदारकी ची उमेदवारी मिळाली आहे. प्रशांत चेडे यांनी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्यात सहभाग घेऊन वाशी येथे म्हणून दादा जरांगे पाटील यांची प्रचंड मोठी सभा घेतली होती. प्रशांत चेडे आरक्षण लढ्यात कार्यरत त्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवले होते व समाजासाठी व मराठा आरक्षणासाठी लढायचे त्यांनी ठरवले आणि त्यावेळेस पासून आज पर्यंत प्रत्येक लढ्यात हे सामील झाले. जरंगे पाटील यांनी मराठा समाजासोबत चर्चा करून लढायचे की पाडायचे या बाबत अंतरवाली येथे बैठक बोलावली होती या बैठकीत सर्व सकल मराठा बांधवांचा निवडणूक लढवण्याचा सुर निघाला. यामुळे दादांनी ज्यांना ज्यांना विधानसभेची निवडणूक लढवायची आहे त्यांनी उमेदवारी अर्ज भरावेत. यामधून जो एक उमेदवार फायनल होईल त्याच्या पाठीमागे सर्वांनी उभे राहावे यावर एकमत झाले आणि ठरल्याप्रमाणे वाशि भूम परंडा मतदारसंघात प्रशांत चेडे, दिनेश मांगले, गोरख भोरे, यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

मुख्य संपादक विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक बघण्यासाठी
वाचा प्रगत किसान न्यूज
डिजिटल प्रिंट मीडिया