इंदापूर येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात

Spread the love

वाशी इंदापूर=दिनांक=19 /8/ 2025 मंगळवार

14 व 15 ऑगस्ट रोजी झालेल्या धुवाधार पावसामुळे अतिवृष्टी झाली नदी नाले एक झाले शेतातील उभ्या पिकात पाणी शिरले गोठ्यात पाणी शिरले सोयाबीन मूग उडीद तूर यासह शेतकऱ्यांनी पावसाळी कांदा लागवडी साठी टाकलेल्या रोपाचे व पेरलेल्या कांद्याचे पण नुकसान झाले. वाशी तालुक्यातील तिन्ही मंडळात 91, 125 आणि 82 मिलीमीटर पाऊस पडला. कृषिमंत्री दत्ता भरणे यांनीही वाशी तालुक्यात दौरा करून वाशी तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांना पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे सूचना दिल्या याप्रमाणे तहसीलदार साहेबांनी वाशी तालुक्यात पंचनामा करण्याचे आदेश ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक यांना दिल्या याप्रमाणे कामही चालू झाले पण सरसकट पंचनामे न करता केवळ नदीकाठचे क्षेत्राचे पंचनामे करण्यात येऊ लागले यामुळे शेतकऱ्यात नाराजी पसरली आहे. सरसकट नदीकाठचे पंचनामे न करता इतर क्षेत्रातील पाणी साचलेले आहे त्यामुळे सरसकट पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत इंदापूर येथे कृषी सहाय्यक थोरात मॅडम, तलाठी वाघमारे मॅडम, ग्रामसेवक माळी साहेब तसेच गिरीश गपाट विजय गपाट यांनी शेतात बांधावर जाऊन पंचनामा करण्यास सुरुवात केली.

मुख्य संपादक विलास गपाट

,🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र🌻

निपक्ष निर्भीड सकारात्मक बातम्यासाठी

वाचा प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!