इंदापूर ग्रामपंचायती कडून शिक्षक रत्न पुरस्कार 2025* देऊन गुरुजींचा सन्मान.
वाशी / इंदापूर=गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर 2025विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीमध्ये विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उत्कृष्ट काम केलेल्या शिक्षकांच्या कार्याचा गुणगौरव करण्याचा मानस सर्व ग्रामस्थ मौजे इंदापूर आणि ग्रामपंचायत कार्यालय इंदापूर यांच्यावतीने सुरू करण्यात आलेला आहे.. यांतर्गत सन 2025 पासून अति उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार ट्रॉफी मानपत्र शाल,श्रीफळ आणि रोख 11000 रुपये बक्षीस देऊन करण्याची सुरुवात आज पासून झाली.. वाशी तालुक्याचे सन्माननीय गटशिक्षणाधिकारी साहेब श्रीमान घोलप सर, कार्यालयीन विस्तार अधिकारी श्रीमती टेकाळे मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये आणि शुभ हस्ते गावचे सरपंच सन्माननीय श्री गणेश जी गपाट , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिंदुराज गपाट यांच्यातर्फे व उपस्थितीमध्ये श्री बळीराम जगताप, श्री रवींद्र गायकवाड, श्रीमती ललिता लोमटे, श्री प्रवीण कुंभार यांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट मुख्याध्यापकाचे कार्य विचारात घेऊन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री भायगुडे सर यांचा देखील सत्कार करण्यात आला. इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, आठवी एन एम एम एस परीक्षा, मंथन परीक्षा, राबविलेले शैक्षणिक उपक्रम , आणि वर्गाची गुणवत्ता विचारात घेऊन या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.. याबद्दल अशा प्रकारचा शिक्षकांच्या कार्याचा गुणगौरव केल्याबद्दल पुरस्कार प्राप्त शिक्षक यांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे व सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. आणि यापुढेही शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अधिक जोमाने आम्ही काम करू सर्व ग्रामस्थांना आश्वासित केले.जिल्हा परिषद प्रशालेतील श्री जगताप बळीराम रोहिदास व श्री गायकवाड रवींद्र शामराव यांना विभागून 11000 रुपये रोख सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला
तर केंद्रीय प्राथमिक शाळेतील श्री कुंभार प्रवीण मधुकर व श्री लोमटे ललिता यांना विभागून 11 हजार रुपये रोख सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तर जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक सतीश भायगुडे यांना 5500 उत्कृष्ट मुख्याध्यापकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक=. विलास गपाट
🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र🌻
निर्भीड ,निपक्ष सकारात्मक बातम्यासाठी
वाचा प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया