वैभव साळुंके चा एमबीबीएस साठी प्रवेश छत्रपती शाळेचा विद्यार्थी

Spread the love

वाशी =बुधवार दिनांक 15ऑगस्ट छत्रपती शिवाजी विद्यालयाचा वैभव साळुंके या विद्यार्थ्यांचा एम.बी.बी.एस. साठी प्रवेश.
वाशी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी वैभव संभाजी साळुंके या विद्यार्थ्यांचा अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे येथे एम.बी.बी.एस.या वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झाला आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थिती वर मात करून या विद्यार्थ्याने हे यश संपादन केले आहे.वैभव साळुंके या विद्यार्थ्याने इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण छत्रपती शिवाजी विद्यालय,वाशी या विद्यालयातून पूर्ण केले आहे.
या यशाबद्दल वैभव साळुंखे या विद्यार्थ्याचे शालेय समितीचे चेअरमन श्री तानाजी शिनगारे,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री संदीप कवडे,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री नेताजी नलवडे,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुहास थोरबोले,पर्यवेक्षक श्री बापूसाहेब सावंत,विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील भविष्यातील उज्वल यशासाठी व शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक = विलास गपाट

🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र🌻

निर्भीड निपक्ष व सकारात्मक बातम्यांसाठी

वाचा प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!