छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

Spread the love

वाशी शनिवार =दिनांक26 जुलै 2025

  • 75 हजार रुपयांच्या रोख पारितोषिकाचे वितरण.
    वाशी : छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.जयकुमार शितोळे खजिनदार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी‌. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ.श्री.अनंत माने उपस्थित होते.याप्रसंगी श्रीमती. विजयाताई गायकवाड नगराध्यक्षा नगरपंचायत वाशी,प्राचार्य डॉ.ए.बी.कदम, श्री.डी.के.मोरे माजी मुख्याध्यापक छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी, श्री दादासाहेब चेडे,मुख्याध्यापक श्री डी. के .घुमरे व संतोष माने उपस्थित होते.
    गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा या कार्यक्रमात वाशी गावातील व परिसरातील विविध शिक्षण प्रेमी व दानशूर व्यक्तींनी रोख रकमेच्या स्वरूपात देण्यात आलेली पारितोषिके गुणवंत विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली.शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये एस.एस.सी परीक्षेत विद्यालयातील प्रथम क्रमांक प्राप्त चेडे अर्जुन उल्हास (99. 40% गुण) या विद्यार्थ्यास एकूण पारितोषिक रक्कम रुपये 16664/- दोन पुस्तके व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.प्रथम क्रमांक प्राप्त पत्की ध्रुव सचिन( 99.40% गुण) या विद्यार्थ्याला एकूण पारितोषिक रुपये 10854/- दोन पुस्तके व सन्मान चिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन गुणगौरव करण्यात आला. द्वितीय क्रमांक प्राप्त व विद्यालयातून मुलीतून प्रथम क्रमांक प्राप्त कु. मस्कर आर्या देविदास (98.60% गुण)या विद्यार्थिनीला एकूण पारितोषिक रुपये 11652/- दोन पुस्तके व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी कु. मोळवणे अस्मिता सूर्यकांत (97.80% गुण) या विद्यार्थिनीला एकूण पारितोषिक रुपये 4852/- दोन पुस्तके व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर 90% पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या पंधरा विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस. आर.थोरबोले यांनी प्रत्येकी पाचशे रुपये रोख पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला.याचबरोबर पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा,नवोदय प्रवेश परीक्षा व एन. एम.एम.एस .परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शालेय क्रीडा स्पर्धेतील राज्यस्तर आणि विभाग स्तरावर यश संपादन केलेल्या विद्यार्थी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
    मुस्लिम समाजातील विद्यालयातील इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून कै. महंमद हारूण जमालोद्दिन काझी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रोख रक्कम रुपये पाचशे रुपये एकूण 09 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली.श्रीमती तहनियत महंमद हारूण काझी, पत्रकार शोएब काझी व शाहबाज काझी यांच्या वतीने ही पारितोषिकाची रक्कम देण्यात आली होती.
    सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.आर‌.थोरबोले व पर्यवेक्षक श्री बापूसाहेब सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी श्री संदीप कवडे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती व श्री नेताजी नलवडे उपाध्यक्ष शिक्षक पालक संघ यांचे सहकार्य लाभले. विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका आणि शिक्षिकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.आर.थोरबोले यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री एस.व्ही.क्षीरसागर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन श्री एस.एस.धारकर, श्री जी.एम. देशमुख,श्री एस.बी.छबिले व श्री ए.बी.वाघेरे यांनी तर आभार पर्यवेक्षक श्री बापूसाहेब सावंत यांनी मानले.

मुख्य संपादक =विलास गपाट

🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र🌻

निर्भीड व सकारात्मक बातम्यांसाठी

वाचा प्रगत किसान डिजिटल प्रिंट मीडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!