धाराशिव =गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्ह्याच्या दोन दिवस दौऱ्यावर होते यादरम्यान व्हाईस ऑफ मीडिया धाराशिव जिल्हा यांच्या विमा कवच प्रदान कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना पत्रकारांसाठी ही एसटीमध्ये सवलत देण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी अगोदरच एसटी लाडक्या बहिणीच्या 50% सवलतीमुळे व ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीमुळे दररोज तीन कोटी रुपये तोट्यात आहे यामुळे आता इतर कुठलीही सवलतीची योजना एसटीला करणे शक्य नाही. पण निवडणूक झाल्या नंतर सरकारने एसटी महामंडळ लाडक्या बहिणीमुळे फायद्यात असल्याचे सांगितले होते पण आज खरी हकीगत प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांनी मांडली. यामुळे सरकारने एसटी महामंडळ फायद्यात असल्याचे खोटी बतावणी केल्याचे आता उघड झाले आहे.
