धाराशिव इंदापूर=बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी वाशी तालुक्यातील इंदापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर इतिहासावर भाषणातून विचार मांडले . यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक वृंद प्रशाला चे मुख्याध्यापक भायगुडे सर, जगताप सर कुरवलकर सर शिंदे सर चव्हाण सर उपस्थित होते.
नेपोलियन, जुलिअस सिझर, अलेक्झांडर हे सगळे महानच योद्धे होते. किंबहुना शिवरायांपेक्षा अफाट साम्राज्याचे धनी होते. यांच्यावर आजवर असंख्य पुस्तके लिहिली गेली. पण सदर योद्धे कधी कुणाची अस्मिता, आदर्श, अभिमान बनू शकले असतील का, याबाबत मी साशंक आहे.
नुसतं तलवारीच्या जोरावर जग पादाक्रांत करून, शत्रूचा बिमोड करून तुम्ही महान योद्धा जरूर सिद्ध होतात पण कल्याणकारी, उदात्त, नीतीवंत अशी विविध अभिमानास्पद बिरुदं जगात फक्त शिवरायांनाच लाभली.
शून्यातून सुरुवात करत, शत्रूचा निःपात करत, आपलं राज्य मजल दरमजल वाढवत एक योद्धा बनून सुद्धा जगातला सर्वश्रेष्ठ जनकल्याणकारी उदात्त चारित्र्यवान राजा शिवरायांना होता आलं यातच शिवरायांचं ‘अद्वितीत्व’ सामावलं आहे.
जगातला असा एकमेव राजा ज्यासाठी जातीधर्माच्या शृंखला तोडून समाजातील प्रत्येकजन लढला. यामुळेच महात्मा फुले हे शिवरायांना ‘कुळवाडीभूषण’ म्हणून संबोधतात, या उपाधी मध्ये बरेच काही सामावलेलं आहे. अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, समाजातील प्रत्येक घटकाचा अभिमान म्हणजेच “कुळवाडीभूषण”.
कुळवाडीभूषण छत्रपती शिवराय महाराज .
मुख्य संपादक विलास गपाट
प्रगत किसान प्रगत राष्ट्र
निर्भीड व सकारात्मक निष्पक्ष बातम्या साठी
वाचा प्रगत किसान डिजिटल, प्रिंट मीडिया